मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी त्यांचा पहिला सिनेमा 'बॉबी' रिलीज होण्यापूर्वीच सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं. मात्र, लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर डिंपल यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं आणि बर्याच हिट चित्रपटांचा भाग बनून प्रेक्षकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं. डिंपल यांच्या नावामागे एक किस्सा आहे या बद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.
डिंपल यांचे वडील खूप अंधश्रद्धाळू होते, खरं तर जेव्हा-जेव्हा कपाडिया कुटुंबात मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या नावच्या शेवटी LE असलंच पाहिजे. म्हणूनच चुन्नी भाई कापडिया यांनी आपल्या मुलींचे नाव डिंपल आणि सिंपल कापडिया असं ठेवलं.
डिंपल आणि राजेश खन्ना यांच्या लग्नानंतर, जेव्हा त्यांची पहिली मुलगी जन्माला आली, तेव्हा डिंपल यांनी आपल्या कुटूंबातली ही पद्धत तशीच पुढे चालू ठेवली. तिचं नाव ट्विंकल खन्ना आणि दुसर्या मुलीचं नाव रिंकल ठेवलं. एका वृत्तानुसार, जेव्हा चित्रपटांमध्ये रिंकलला लाँच करण्याची वेळ आली तेव्हा काही लोकांनी म्हणालं की, हे हिरोईनसाठी नाव योग्य नाही, ते बदलून घ्या. मात्र, प्रयत्न करूनही असं कोणतंही नाव सापडलं नाही, ज्या नावात 'एल' 'ई' शेवटी येईल.
रिंकलला चित्रपटासाठी खूप आधीच कास्ट केलं गेलं होतं, तिने शूटिंग देखील सुरू केलं होतं पण तिचं नाव निश्चित होऊ शकलं नाही. जेव्हा चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ आली तेव्हा डिंपल यांनी आपल्या मुलीचं नाव बदलून रिंकी खन्ना असं ठेवलं. रिंकीचा पहिला चित्रपट 'प्यार में कभी कभी' प्रदर्शित झाला आणि तो फ्लॉप ठरला. यानंतर रिंकीचा दुसरा चित्रपट 'जिस देस मे गंगा रेहती है' हा चित्रपट आला आणि तो सुद्धा फ्लॉप झाला. ४ वर्षात रिंकीने बर्याच मोठ्या स्टार्ससोबत ८ चित्रपटांमध्ये काम केलं पण ती यशस्वी होवू शकली नाही. सगळे सिनेमे फ्लॉप झाल्यानंतर रिंकीने फिल्म इंडस्ट्रीला निरोप दिला आणि लग्न केलं. आजही काही लोक असं म्हणतात की, रिंकीच्या नावाच्या शेवटी 'एल' ई' नसल्यामुळे ती सिनेसृष्टीत अपयशाचं कारण ठरली.