Stree 2 Trailer: ती तरुणांना घेऊन जायची, हा तरुणी पळवतोय… ‘सरकटे का आतंक’ एकदा पाहाच!

Stree 2 Trailer : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ चा ट्रेलर पाहिलात का? 

दिक्षा पाटील | Updated: Jul 18, 2024, 03:28 PM IST
Stree 2 Trailer: ती तरुणांना घेऊन जायची, हा तरुणी पळवतोय… ‘सरकटे का आतंक’ एकदा पाहाच! title=
(Photo Credit : Social Media)

Stree 2 Trailer : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ ची चर्चा सुरु होती. बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ‘स्त्री 2’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात चंदेरीत आता सरकटेच्या आतंक पाहायला मिळणार आहे. या आधी चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळाला होता आणि आता जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यात अनेक सीन्स पाहायला मिळत आहे. 

‘स्त्री 2’ च्या ट्रेलरविषयी बोलायचे झाले तर यात चंदेरीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. पुन्हा एकदा लोकांमध्ये ‘स्त्री’ परत आल्याचे दहशत पाहायला मिळत आहे. खरंतर सगळ्यांना भीती आहे की स्त्री परत आली आहे. एकीकडे श्रद्धा कपूरच्या सीक्वलची वेगळी पटकथा पाहायला मिळाली होती तर आता एक वेगळी पटकथा पाहायला मिळत आहे. तर यातही श्रद्धा ही पुन्हा एकदा स्त्रीच्या भूमिकेत दिसणार असून चंदेरीच्या लोकांची रक्षा करताना दिसणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

खरंतर जेव्हा या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं तेव्हा त्यात श्रद्धा कपूरनं लिहिलं होतं की ‘काली ताकत से सबकी रक्षा करने वो आ रही है।’ तर त्याच शेअर केलेल्या पोस्टरमध्ये लिहिण्यात आलं होतं की ‘सरकटे का आतंक, ओ स्त्री रक्षा करना।’ तर पहिल्या चित्रपटाच्या तुलनेत ‘स्त्री 2’ मध्ये श्रद्धा ही सकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. आता सगळ्यांना प्रश्न आहे तो म्हणजे ‘सरकटे’ च्या भूमिकेत कोण दिसणार आहे. आता या सगळ्याला पाहण्यासाठी सगळेच प्रेक्षक हे उस्तुक आहेत. 

हेही वाचा : अनंत अंबानीनं लग्नात घातली शाहजहांची Original कलगी! किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल

दरम्यान, ‘स्त्री 2’ विषयी बोलायचे झाले तर 2018 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरशिवाय अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली होती. ‘स्त्री 2’ विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अपारशक्ति खुराना, तमन्ना भाटिया, अभिषेक बनर्जी सारखे कलाकार दिसणार आहेत.