'भयानक आहे हे, तरीही रोज जगावं लागतं'

मुंबईकरांच्यावतीने व्यक्त केली खंत 

Updated: Dec 26, 2019, 11:43 AM IST
'भयानक आहे हे, तरीही रोज जगावं लागतं'  title=

मुंबई : बुधवारी मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान घेण्यात आलेल्या पॉवरब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ऐन ख्रिसमसच्या दिवशी 5 तास रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली. पॉवरब्लॉकदरम्यान करण्यात आलेल्या सुविधा आणि उपाययोजना तुटपुंजी ठरल्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

ख्रिसमसनिमित्त सार्वजनिक सुट्टी होती. मात्र, अनेक खासगी कंपन्यांचे कामकाज सुरू होते. त्यामुळे डोंबिवली स्थानकात प्रवाशांना मोठ्या गर्दीच्या गैरसोईला सामोरे जावे लागले. तसेच गार्डरच्या कामामुळे रेल्वे लोकल 15 मिनिटे उशिरा सोडण्यात आल्या होत्या. मध्य रेल्वेचं हे सगळं नियोजन फसल्याचं दिसून आलं. 

डोंबिवली स्थानकातील गर्दीचे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातील एक व्हिडिओ पोस्ट करत अभिनेता सुबोध भावेने केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे खंत व्यक्त करू मुंबईकरांच्यावतीने एक विनंती देखील केली आहे. 

'भयानक आहे हे, आणि हे रोज जगावं लागत, ही वेळ दोषारोप करण्याची नाहीये तर खरोखरी मनापासून या सर्वांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याची आहे.भारतीय रेल्वे सक्षम आहेच. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रीत प्रयत्न करावे हीच तमाम मुंबईकरांच्या वतीने विनंती. अशी पोस्ट ट्विट करत राजेश कदम यांनी ट्विट केलेला व्हिडिओ रिट्विट केला आहे.