Amitabh Bachchan यांच्यावर इतकी वाईट वेळ? गरिबी पाहून चिंतेत पडाल

Amitabh Bachchan परिस्थिती प्रत्येक वेळी सारखीच नसते... दिवस बदलतात हेच इथे लक्षात येत आहे

Updated: Dec 10, 2022, 01:11 PM IST
Amitabh Bachchan यांच्यावर इतकी वाईट वेळ? गरिबी पाहून चिंतेत पडाल title=
Such a bad time on bollywood Actor Amitabh Bachchan You will get worried after seeing poverty nz

Amitabh Bachchan : आपल्या सगळ्यांनाच माहित आहे बॉलिवूडचा (Bollywood) शहेनशाह. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने स्वत:ची चित्रपटसृष्टीत (Film Industry) ओळख निर्माण केली. आज बिग बी यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. अमिताभ बच्चन याच्यांकडे प्रत्येक ती गोष्ट आहे ज्याचे सर्वसामान्य लोकं स्वप्न पाहतात. अशावेळेस नेहमीच व्यक्ती आपल्या आयुष्यासोबत प्रयोग करतात. असाच काहीसा प्रयोग अमिताभ बच्चन यांनी केला होता. (ABCL) कंपनीबद्दल तुम्हाला माहिती असेलच. ही कंपनी अमिताभ बच्चन यांची होती. या कंपनीमुळे अमिताभ बच्चन पाई-पाईवर अवलंबून राहिले. सगळेच प्रयोग यशस्वी होतील गरजेचे नाही  काही प्रयोग अयशस्वी होतील. (Such a bad time on bollywood Actor Amitabh Bachchan You will get worried after seeing poverty nz)

एबीसीएल कंपनीचे बरेच नुकसान

(ABCL) कंपनीमुळे अमिताभ बच्चन यांना अत्यंत कठीण टप्प्यातून जावे लागले. ही कंपनी चित्रपट निर्मिती, वितरण आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम करत होती. अमिताभ यांना या कंपनीकडून खूप आशा होत्या. बरं, या कंपनीकडून जितकी अपेक्षा होती, तितकी ही कंपनी ही अपेक्षा पूर्ण करू शकली नाही. याच कारणामुळे बिग बींना (Big B) खूप त्रास सहन करावा लागला होता.

 

धीरूभाई अंबानी यांनी केली मदत 

अमिताभ बच्चन यांच्या कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत होता. अशा परिस्थितीत अनेकवेळा अमिताभ बच्चन यांना आपली कंपनी वाचवण्यासाठी कर्ज घ्यावे लागले. अशा स्थितीत तो खूप कर्जबाजारी झाला होता. त्यांचे बँक खाते पूर्णपणे बंद झाले. यावेळी अमिताभ बच्चन यांना मुकेश अंबानी यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी सर्वाधिक मदत केली. यामुळेच अंबानी आणि बच्चन कुटुंबातील नाते खूपच खास आहे.

मृत्युदता चित्रपटामुळे कंपनी बुडाली

मृत्युदता या चित्रपटामुळे अमिताभच्या कंपन्या बुडाल्या. मृत्युदाता हा चित्रपट वाईट मार्गाने फ्लॉप ठरला होता. यानंतरच अमिताभ यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अमिताभच्या कंपनीने ज्या काही चित्रपटात पैसे गुंतवले होते, तो चित्रपट वाईट मार्गाने फ्लॉप ठरला. यानंतर अमिताभ यांनी ही कंपनी बंद केली होती. या वाईट काळात अमिताभ यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला पण त्यांनी हार मानली नाही. ही कंपनी बंद झाल्यानंतर त्यांनी हळुहळू काम करायला सुरुवात केली आणि मग जाऊन कर्ज फेढले.