मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्सची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूर, सारा अली खान अभिनेता टायगर श्रॉफनंतर अभिनेता सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अहान 'तडप' या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 'तडप' चित्रपटाची कथा एका प्रेमाच्या गोष्टीवर आधारलेली असणार आहे. चित्रपटात अहान अभिनेत्री तारा सुतारियासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अहानचा पहिलाचं चित्रपट असल्यामुळे तो प्रचंड उत्सुक आहे. चित्रपट 3 डिसेंबर 2021 मध्ये रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.
अहानच्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी नाडियाडवाला ग्रंडसन एंटरटेनमेंटच्या खांद्यावर आहे. नाडियाडवाला ग्रंडसनने चित्रपटाची घोषणा त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
तारा सुतारियाने दोन वर्षांपूर्वी 'शोबिज' च्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तारा 'स्टूडेन्ट ऑफ द ईयर 2 ' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. पण तारा अद्यापही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नाही. आता 'तडप' चित्रपटाच्या माध्यमातून ताराचे स्टार चमकतात का? हे येणारा काळचं ठरवेल.
'तडप' चित्रपटात अहान आणि तारा शिवाय सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा आणि सुमित गुलाटी मुख्य भुमिकेत दिसणार आहे. सुनिल शेट्टीच्या मुला आधी मुलगी आथिया शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'हिरो' चित्रपटाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या भेटीस आली. हिरो चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी अभिनेता सलमान खानकडे होती.