...म्हणून मॅनेजर दिशाच्या निधनानंतर काळजीत होता सुशांत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे.   

Updated: Aug 1, 2020, 04:51 PM IST
...म्हणून मॅनेजर दिशाच्या निधनानंतर काळजीत होता सुशांत

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्याने आत्महत्या का केली. याचात कसून शोध सध्या पोलीस घेत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ४० जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे आता या प्रकरणाला आणखी एक कलाटणी मिळाली आहे. मंगळवारी रात्री सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांकडून याप्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे. 

दरम्यान एक्स मॅनेजरच्या निधनानंतर सुशांत फार काळजीत आणि घाबरलेला होता असा खुलासा सिद्धार्थ पिठानीने 'झी न्यूज'सोबत बोलताना केला. तो म्हणाला, 'ज्या दिवशी दिशा सालियानच्या निधनाची बातमी समोर आली तेव्हा सुशांत काळजीत होता. ही बातमी जेव्हा त्याला कळाली तेव्हा घरात त्यांची बहिण आणि काही मित्र देखील असल्याचं त्याने सांगितले. 

सिद्धार्थ पिठानी पुढे म्हणाला, 'तो पूर्णपणे घाबरलेला होता. तो रडत होता आणि कोणालातरी फोन करण्याचा प्रयत्न देखील करत होता.' सांगायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचा खुलासा होत आहे. पण त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप समोर आलेलं नाही. 

दरम्यान सुशांतची आत्महत्यानसून ही हत्या असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. सध्या पोलील याप्रकरणी चौकशी करत आहेत. एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी हाती काही लागले नसल्यामुळे ही केस पोलिसांऐवजी CBIकडे सोपवण्यात यावी अशी मागणी होत असताना महाराष्ट्र सरकारने या चौकशीस नकार दिला आहे.