रिलेशनशिपच्या खुलास्यानंतर सुष्मिता सेनकडून खास पोस्ट; म्हणाली 'I Love You'

ललित मोदी नाही तर कोणाला म्हणते सुष्मिता सेन 'I Love You', पाहा फोटो

Updated: Jul 21, 2022, 01:39 PM IST
रिलेशनशिपच्या खुलास्यानंतर सुष्मिता सेनकडून खास पोस्ट; म्हणाली 'I Love You' title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. सुष्मिता ही ललित मोदी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी ललित यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपविषयी माहिती दिली होती. या बातमीने सगळ्यांना धक्काच बसला. आता सुष्मिता आणखी एका पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 

सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत सुष्मिताने निळ्या रंगाचा टॉप परिधान केला असून तिने सनग्लासेस घातले आहेत. तर सुष्मिता गाडीत असल्याचे दिसते. हा फोटो शेअर करत "आय लव्ह यू मित्रांनो" असे कॅप्शन सुष्मिताने दिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुष्मिताची ही पोस्ट पाहिल्यानंतर ती खासगी आयुष्यात आनंदी असलेल्या दिसते. पण ललित मोदी यांनी त्यांच्या रिलेशनची बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितल्यानंतर काही नेटकऱ्यांना ही गोष्ट आवडली तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. अनेकांनी सुष्मिताला 'गोल्ड डीगर' म्हणूनही हिणवलं. त्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुष्मिताने सडेतोड उत्तर दिलं.