Swara Bhaskar ने लेकीला दिलं अर्थपूर्ण नाव, पहिला फोटो शेअर करत दिली गोड बातमी

Swara Bhaskar Baby Name Meaning : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अतिशय अनोखं नाव देत स्वराने लेकीचा पहिला फोटो शेअर केलाय. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 26, 2023, 05:17 PM IST
Swara Bhaskar ने लेकीला दिलं अर्थपूर्ण नाव, पहिला फोटो शेअर करत दिली गोड बातमी  title=

Swara Bhaskar Baby First Picture : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या घरी चिमुकल्या पाऊलांनी लेक आली. स्वराने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. न्यू बॉर्न बेबीचा फोटो शेअर करत स्वराने लेकीचं नाव देखील जाहिर केलं. स्वराने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लेकीच्या जन्माची गुड न्यूज शेअर केलीय. स्वराने फेब्रुवारी महिन्यात आई होणार असल्याची घोषणा केली होती. जानेवारी २०२३ रोजी राजकीय कार्यकर्ता फहाद अहमद याच्यासोबत कोर्ट मॅरेज केले होते. फहाद अहमद समाजवादी पार्टीचे राज्य युवा अध्यक्ष पद सांभाळत आहे. 

स्वराच्या लेकीचं नाव आणि अर्थ 

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी आपल्या लेकीला अतिशय गोड नाव दिलं आहे. या दोघांनी लेकीचं नाव 'राबिया' असं ठेवलं आहे. राबिया या नावाचा अर्थ अतिशय खास आहे. गणेशोत्सवात जन्मलेल्या या लेकीच्या नावाचा अर्थ आहे 'राजकन्या' आणि 'गोड मुलगी'. अंकशास्त्रानुसार राबिया या नावाचा शुभांक ११ आहे. २३ सप्टेंबर २०२३ रोजी राबियाचा जन्म झाल्याचं स्वराने सांगितलं. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

लेकीच्या जन्माची खास पोस्ट 

स्वरा पोस्टमध्ये म्हणते की, आमची प्रार्थना फळाला आली. परमेश्वराकडून आशिर्वाद मिळाला. अतिशय गोड गाणं कानी पडलं. रहस्यमय सत्य घडलं. २३ सप्टेंबर २०२३ रोजी आमची लेक राबियाचा जन्म झाला. आभारी आहोत, कृतज्ञ आहोत. सगळ्यांनी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आशिर्वाद. 

लेकीचा पहिला फोटो केला शेअर 

स्वरा आणि फहाद यांनी लेकीला कुशीत घेतल्याचे फोटो शेअर केले आहे. स्वराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लेकीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. फहाद देखील लेकीला कुशीत घेऊन लाड करताना दिसत आहे. स्वराने शेअर केलेल्या चारही फोटोंमध्ये लेकीच्या जन्माचा आनंद अतिशय स्पष्ट दिसत आहे. स्वरा आणि फहादसाठी हा अतिशय खास क्षण आहे. 

राजकुमारी अर्थाची मुलींची नावे 

  • अकुती
  • राजवी
  • तानया 
  • अवंतिका 
  • हरिथा 
  • गिरवानी 
  • मृणाली 
  • मोशिका 
  • अमयरा 
  • कियारा 

मुलींची रॉयल मराठी नावे 

  • आभा - झळाळी 
  • आद्या - सुरूवात 
  • शार्वी - दिव्यत्व 
  • एशा - पवित्र 
  • एलिना - बुद्धीमान मुलगी
  • फेलिशा - नशीबवान लेक 
  • गर्वी - अभिमान वाटावा अशी लेक 
  • गाथा - कथा
  • लेषा - जीवनात आनंद घेऊन जगणारी मुलगी 
  • सावी - चांदणी