मुंबई : तबू सध्या ‘गोलमाल अगेन’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. रोहित शेट्टीच्या या सिनेमातून परिणीतीसोबत तबूचीही एन्ट्री होणार आहे. मित्र अजय देवगनसोबत काम करायला मिळाल्याने तबू सध्या चांगलीच खूष आहे.
प्रमोशन दरम्यान पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना तबूला तोंड द्यावं लागत आहे. नुकतेच तिने एका पत्रकार परिषदेत तिच्या आणि सलमानच्या लग्नाच्या चर्चांवर भाष्य केलंय.
तुम्हाला वाटत असेल की, सलमान खान आणि तबूचं लग्न होणार आहे का? तर तसं नाहीये. पत्रकारांनी जेव्हा तबूला पर्सनल लाईफबद्दल विचारले तेव्हा ती चिडून म्हणाली की, ‘सर्वांनी हाच प्रश्न विचारला. आता तुम्हीही माझ्या लग्नाबाबत प्रश्न विचारा. तुम्ही नाही विचारणार माझ्या लग्नाबाबत प्रश्न? माझ्या आणि सलमानच्या लग्नाची चिंता सर्वांना लागली आहे. माझ्या लग्नाबाबत माहिती नाही लोकांना काय इंटरेस्ट आहे. मी आता थकली आहे या प्रश्नाचे उत्तर देऊन देऊन. काहीतरी नवीन विचारा यार’.
दरम्यान, तबू ‘गोलमाल अगेन’ टीमसोबत चांगलीच एन्जॉय करत आहे. तिला ही टीम फारच आवडली आहे. काही दिवसांपूर्वी तिने सांगितले होते की, स्क्रिप्ट न वाचता तिने हा सिनेमा साईन केला होता. हा सिनेमा जरी कॉमेडी असला तरी यात तबूची भूमिका कॉमेडी नसल्याचे तिने सांगितले आहे.