देहविक्री प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात

चेन्नईतील खासगी रिसॉर्टमध्ये कथित देहविक्रीच्या आरोपात तिला ताब्यात घेण्यात आलंय.

Updated: Jun 3, 2018, 03:47 PM IST
देहविक्री प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : 'वानी रानी' कॅरेक्टरसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध तामिळ अभिनेत्री संगीता जोला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तिच्यावर देहविक्री करण्याचा आरोप आहे. चेन्नईतील खासगी रिसॉर्टमध्ये कथित देहविक्रीच्या आरोपात तिला ताब्यात घेण्यात आलंय. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार प्राथमिक तपासात अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. एका खासगी रिसॉर्टमध्ये पोलिसांनी संगीतासहित अनेक अभिनेत्रींना ताब्यात घेतलंय. तसेच ३ नवोदित अभिनेत्रींनाही यातून बाहेर काढण्यात आलंय. या प्रकरणात पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून येथे छापा टाकण्यात आला. यामध्ये सुरेश नावाच्या एका इसमासही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

अनेक नावांचा खुलासा 

या प्रकरणात अनेक नावांचा खुलासा होण्याची शक्यता आहे. तामिळ टीव्ही इंडस्ट्रीतील संगीता प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक सिरियल्समध्ये काम केलंय. 'वानी रानी' च्या कॅरेक्टरने तिला फार प्रसिद्धी मिळवून दिली. या व्यतिरिक्त संगीता काही तामिळ सिनेमातही दिसली.