हावर्ड विद्यापीठात प्रमुख अतिथी म्हणून तनुश्री दत्ता

मूळ अमेरीकेत उदय झालेल्या # Me Too चे वादळ अद्यापही शमलेले नाही. 

Updated: Feb 10, 2019, 06:27 PM IST
हावर्ड विद्यापीठात प्रमुख अतिथी म्हणून तनुश्री दत्ता title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने भरतात # Me Too मोहीम नावारुपास आणली. भरतात परतल्यानंतर तनुश्रीने तिच्यावर झालेल्या अन्यायाला # Me Too मोहीमे अंतर्गत वाचा फोडली. मूळ अमेरीकेत उदय झालेल्या # Me Too चे वादळ अद्यापही शमलेले नाही.  तनुश्री दत्ता नंतर अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटना 
# Me Too मोहीम द्वारे जगासमोर आणल्या. तनुश्रीला हावर्ड विद्यापीठाकडून खास आमंत्रण आलं आहे. 16 फेब्रुवारी रोजी हावर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थांनी भारतीय परिषदेत 2019  कार्यक्रमाचे आयोजन केले असून कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून तनुश्री दत्ता उपस्थित राहणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Invited to speak at the Harvard Business School in Boston Massachusetts.India Conference 2019 on feb 16, a flagship event organized by the graduate students of Harvard Business school and Harvard Kennedy School. http://indiaconference.com/2019/speakers/

A post shared by Tanushree Dutta (@iamtanushreeduttaofficial) on

 

या कार्यक्रमात तनुश्री दत्ता, तिचा आतपर्यंतचा प्रवास, महिलांवर होणारे अत्याचार, लहान मुलींवर होणारे बलात्कार, # Me Too मोहीम यांसारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. तनुश्रीने स्वत: आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ही माहिती दिली.

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर भारतात 'मी टू' मोहीमेला सुरूवात झाली.राजकारण,बॉलिवूड,आणि मीडिया मध्ये कार्यरत असणाऱ्या अनेकांवर 'मी टू' मोहीमे अंतर्गत हल्ले झाले. # Me Too मोहीमेमुळे ग्लॅमरच्या दुनियेचे खरे वास्तव जगासमोर आणले.