Abhishek Bachchan चा The Big Bull पाहाण्यासाठी आई जया आणि पत्नी एश्वर्याने दिला नकार, समोर आलं कारण

सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच अभिषेक बच्चन यांनी मोठा खुलासा केला होता. त्याने हा चित्रपट आपल्या कुटुंबातील सदस्यांना दाखविला होता, परंतु केवळ त्याचे वडील अमिताभ बच्चन यांनी हा सिनेमा पाहिला होता.

Updated: Apr 9, 2021, 04:49 PM IST
Abhishek Bachchan चा The Big Bull पाहाण्यासाठी आई जया आणि पत्नी एश्वर्याने दिला नकार, समोर आलं कारण

मुंबई : अभिषेक बच्चनचा 'बिग बुल' हा चित्रपट रिलीज झाला आहे. अभिषेक बच्चनच्या अभिनयाचं लोक कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर या सिनेमाविषयी बरीच चर्चा रंगली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच अभिषेक बच्चन यांनी मोठा खुलासा केला होता. त्याने हा चित्रपट आपल्या कुटुंबातील सदस्यांना दाखविला होता, परंतु केवळ त्याचे वडील अमिताभ बच्चन यांनी हा सिनेमा पाहिला होता.

ऐश्वर्यानेही हा चित्रपट पाहण्यास नकार दिला होता
अभिषेक बच्चनचा 'पापा' हा चित्रपट अमिताभ यांना खूप आवडला होता आणि हा सिनेमा पाहून अभिषेकचं त्यांनी कौतुकही केलं होतं. अभिषेक बच्चनची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आई जया बच्चन यांनी हा सिनेमा पाहण्यास नकार दिला. हे करण्यामागील नेमंक कारण काय होतं हेही अभिषेकने सांगितलं आहे.

खरंतर ऐश्वर्याने त्याला सांगितलं की, हा सिनेमा रिलीज झाल्यानंतरच मी बघेन. त्याचवेळी अभिषेकने आई जयाला देखील हा सिनेमा पाहण्याची विनंती केली होती परंतू त्यांनी देखील ऐश्वर्याप्रमाणेच त्याला प्रतिक्रिया दिली. सांगितलं की, मला हा सिनेमा रिलीज झाल्यानंतरच पहायचा आहे  

एका मुलाखतीमध्ये बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला, 'माझी आई रिलीजपूर्वी माझे चित्रपट पाहत नाही. या प्रकरणात ती थोडी अंधश्रद्धाळू आहे. सिनेमाचा निर्माता अजय देवगनने हा चित्रपट माझ्या कुटूंबीयांना दाखवला होता, पण माझ्या आईने सिनेमा पाहण्यास नकार दिला आहे. तिने सांगितले की, वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून मी हा सिनेमा ९ तारखेला बघेन. मला विश्वास आहे की ती मला योग्य रिव्यू देईल. '

अमिताभ यांना हा चित्रपट आवडला
अभिषेक बच्चन पुढे म्हणाला, "बाकीच्या कुटूंबीयाने या सिनेमाचा आनंद लुटला आणि त्यांना हा चित्रपट आवडला देखील. त्याप्रमाणे वडिलांना हा चित्रपट आवडला. मी खूप खूष आहे कारण, मी ज्या व्यक्तीला मनापासून मानतो त्या व्यक्तीला म्हणजेच माझ्या वडिलांना हा चित्रपट आवडला आहे." याचबरोबर तो म्हणाले की, आपल्या आईप्रमाणेच ऐश्वर्यानेही हा सिनेमा पाहिला नाही. ऐश्वर्या हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच पाहणार आहे.

या चित्रपटचा विषय
'द बिग बुल' स्टॉकब्रोकर हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित आहे. अभिषेक बच्चन व्यतिरिक्त या चित्रपटात सोहम शाह, निकिता दत्ता आणि इलियाना डिक्रूझ मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगनने केली आहे. यापूर्वीही या विषयावर एक वेब सीरिज प्रसिद्ध झाली आहे, ज्याला 'Scam 1992' असं नाव देण्यात आलं आहे. प्रेक्षकांना ही वेब सीरिज खूप आवडली. आता या सिनेमाच्या रिलीजनंतर याची तुलना सीरिज बरोबर केली जात आहे.