The Kerala Story Trailer : शालिनी बनली फातिमा.... 32 हजार बेपत्ता महिलांची कहाणी सांगणारा 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर रिलीज

The Kerala Story Trailer : ट्रेलरच्या सुरुवातीला अदा शर्मा म्हणते की ती केरळची शालिनी उन्नीकृष्ण आहे. तेव्हा अधिकारी तिला तू दहशतवादी संघटनेत कधी गेलीस असे विचारतात. तेव्हा अदा शर्मा त्याआधी मी त्या संघटनेत कशी गेले हे महत्त्वाचे आहे.

Updated: Apr 27, 2023, 09:38 AM IST
The Kerala Story Trailer : शालिनी बनली फातिमा.... 32 हजार बेपत्ता महिलांची कहाणी सांगणारा 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर रिलीज title=

The Kerala Story Trailer : गेल्या काही वर्षांतील किंवा इतिहासातील वादग्रस्त घटनांवर सध्या अनेक चित्रपट समोर प्रदर्शित होताना दिसत आहेत. गेल्या वर्षी आलेल्या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स (the kashmir files) चित्रपटाच्या निमित्ताने देशाने याचा अनुभव घेतला होता. जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या (kashmiri pandit) हत्याकांडावर हा चित्रपट आधारीत होता. पंतप्रधानांपासून अनेकांनी या चित्रपटाचे जोरदार कौतुक केले. दुसरीकडे देशात गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहादचा (love jihad) मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. यानंतर आता केरळमधील (kerala) धर्मांतरांबाबत भाष्य करणारा 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला आहे. द केरळ स्टोरीच्या या ट्रेलरमध्ये  मुलींचे धर्मांतर करून त्यांना दहशतवादाकडे ढकलण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मुलींना इस्लामिक जिहादच्या जाळ्यात अडकून आयएसआयएसच्या (ISIS) दहशतवादी बनवण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे.. केरळमध्ये मुलींचे धर्मांतर कसे होते. हिंदू कुटुंबातील शालिनी फातिमा कशी बनते, याची हादरवणारी गोष्ट या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. ही कथा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे.

दुसरीकडे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अशी अनेक दृश्ये दाखवण्यात आली आहेत ज्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंदू देवतांवर टीका, मुलींना इस्लाम स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश करण्याची पद्धत आणि काही धक्कादायक दृश्ये या 2 मिनिटे 45 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहेत. ट्रेलरची सुरुवात हिंदू कुटुंबातील शालिनीच्या (अदा शर्मा) हातात बेड्या दिसतात. त्यावेळी तिला तू आयएसआयएसमध्ये कधी सामील झालीस असा सवाल केला जातो. यावेळी शालिनी का आणि कशी सामील झाले हे जाणून घेणे आवश्यक आहे, असे सांगते.

गरज पडल्यास त्यांना गर्भवती करा आणि....

एका सीनमध्ये डोक्यावर हिजाब घातलेली मुलगी बाकीच्या मुलींना हे जग फक्त अल्लाह चालवतो, असे सांगत असते. यासोबत या मुली हॉस्टेलमध्ये माज पठण करणाऱ्या मुस्लिम मुलीची नक्कल करतानाही दाखवण्यात आल्या आहेत. दुसऱ्या एका सीनमध्ये एक व्यक्ती म्हणते, त्यांना जवळ आणा, त्यांना कुटुंबापासून वेगळे करा, शारीरिक संबंध ठेवा, गरज पडल्यास त्यांना गर्भवती करा आणि पुढच्या मिशनसाठी आम्हाला लवकरात लवकर सोपवा, असे सांगताना दाखवली गेली आहे.

 

ट्रेलरमध्ये मुस्लिम मुलगी इतर मुलींना तुम्ही कोणत्या देवाला मानता असे विचारते. त्यावेळी दुसरी मुलगी मला वाटतं भगवान शंकर सर्वात मोठा देव आहे. त्यावेळी बुरखा घातलेली मुस्लिम मुलगी म्हणते की जो देव आपल्या पत्नीच्या मृत्यूवर सामान्य माणसासारखा रडतो तो देव कसा असू शकतो. आणखी एका सीनमध्ये मुलींसोबत छेडछाड झाल्यानंतर बुरखा घातलेली मुलगी हिजाब घातलेल्या मुलीवर कधीही बलात्कार किंवा विनयभंग होत नाही, असेही म्हणताना दाखवले गेले आहे.