मुंबईः बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना आपल्या कामाशी तडजोड करायची नाही. गरोदरपणातही या अभिनेत्री चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात राहिल्या. अशा परिस्थितीत त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. तर काहींना जुगाड करून शूटिंग पूर्ण करावं लागलं.
अभिनेत्री काजोल तिच्या 'वुई आर द फॅमिली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गरोदर होती. मात्र, तिने तिच्या चित्रपटाचे शूटिंग गरोदरपणात पूर्ण केलं
काजल अग्रवालला गरोदरपणामुळे नागार्जुन स्टारर द घोस्टमधून बाहेर काढण्यात आले. मात्र काजल अग्रवालनं याबद्दल कधीही काहीही सांगितले नाही.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री करीना कपूर खान दोनदा गर्भवती झाली होती. 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटादरम्यान ती पहिल्यांदा प्रेग्नंट झाली होती, त्यानंतर काही दिवसानंतर चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू झालं. त्यानंतर 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटादरम्यान ती गरोदर राहिली.
'ओम शांती ओम' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फराह खानही गरोदर होती. नंतर तिने तीन मुलांना जन्म दिला.
देवदास चित्रपटादरम्यान माधुरी दीक्षित गर्भवती होती. असे असतानाही माधुरीने चित्रपटातील गाण्याचं शूट केलं होतं.
'शोले' चित्रपटादरम्यान जया बच्चन गरोदर होत्या. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बेबी बंप दिसू नये म्हणून त्या पांढऱ्या रंगाच्या साडीत होत्या असं म्हटलं जातं.
'रझिया सुलतान' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेमा मालीनीही गर्भवती होती. मात्र तरीही त्यांनी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं
ऐश्वर्या राय बच्चन सुद्धा तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान प्रेग्नंट झाली होती, त्यामुळे तिला मध्येच चित्रपट सोडावा लागला होता. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिच्यावर मात्र याचा राग काढला होता.
'जुदाई' या चित्रपटाच्या वेळी श्रीदेवी गर्भवती होती. यावेळी ती जान्हवी कपूरला जन्म देणार होती. त्यावेळी अभिनेत्रीचे लग्नही झालं नव्हतं. चित्रपटाच्या शूटिंगनंतर तिने बोनी कपूरसोबत लग्न केले.