का केलं बिल गेट्सने केलं 'टॉयलेट एक प्रेम कथा'चं कौतुक ?

'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री नारायण सिंह हे बिल गेट्सने केलेल्या स्तुतीने भारावून गेले आहेत. 

Updated: Dec 23, 2017, 05:16 PM IST
का केलं बिल गेट्सने केलं 'टॉयलेट एक प्रेम कथा'चं कौतुक ? title=

मुंबई : 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री नारायण सिंह हे बिल गेट्सने केलेल्या स्तुतीने भारावून गेले आहेत. 

दिग्गजांकडून कौतुक

आपल्या चित्रपटाच्या आश्चर्यकारक परिणामाबद्दल श्री नारायण सिंह कौतुकाने बोलतच राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून आता बिल गेट्सपर्यत अनेक थोरामोठ्यांनी या चित्रपटाची दखल घेतली आहे. 

नीरज पांडेकडे गिरवले धडे

श्री नारायण सिंह यांनी आपल्या करियरची सुरुवात ये जो मोहब्बत है या चित्रपटपासून केली. पण त्यांना खऱ्या अर्थाने पुढे आणलं प्रसिद्ध दिग्दर्शक नीरज पांडे यांनी. त्यांच्या हाताखाली काम करताना खऱ्या अर्थाने नारायण सिंह यांना वाव मिळाला. त्यानंतर त्यांना जेव्हा स्वतंत्रपणे चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांच्यासमोर तीन पटकथा होत्या. त्यातली  'टॉयलेट एक प्रेम कथा'ची पटकथा त्यांना भावली. 

अक्षयकुमारची साथ

सुरुवातीला अनेक आघाडीच्या कलाकरांनी या पटकथेवर नाकं मुरडली, पण अक्षयकुमारने यात रस घेतला. अक्षयकुमारचं या चित्रपटात आगमन झाल्यानंतर मात्र सर्व सुरळित होत गेल्याचं नारायण सिंह म्हणतात. अक्षयकुमारने प्रत्येक क्षणी आपल्याला मदत केली. कायम आपल्या पाठीशी उभं राहिल्याचं नारायण सिंह आवर्जून सांगतात.

आभारासाठी शब्दच नाहीत

बिल गेट्सच्या स्तुतीने ते भारावून गेलेत. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि बिल गेट्सचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असं नारायण सिंह म्हणतायेत. यामुळे आपलं मनोबल वाढल्याचंही ते सांगतात.