उर्वशीचा 'तो' व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांना आली ऋषभ पंतची आठवण, म्हणाले...

तिचा हा लूक यूजर्सला घायाळ करतच आहे. शिवाय नेटकरी ऋषभ पंतची पण (Rishabh Pant) आठवण काढतं आहेत. 

Updated: Aug 15, 2022, 05:38 PM IST
 उर्वशीचा 'तो' व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांना आली ऋषभ पंतची आठवण, म्हणाले... title=
trending news urvashi rautela stunned in europe wearing a sari the user said rishabh bhai look you in marathi

Urvashi Rautela: अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कायम आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. म्युझिक अल्बम, सोशल मीडिया आणि बॉलीवूडमध्ये ती तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. याशिवाय उर्वशी आणि ऋषभ पंतसोबतच्या सोशल मीडियावरील वॉरमुळे ती चर्चेत असते. तिने इंस्टाग्रामवर साडीमधील एक व्हिडीओ टाकला आहे. तिचा हा लूक यूजर्सला घायाळ करतच आहे. शिवाय नेटकरी ऋषभ पंतची पण (Rishabh Pant) आठवण काढतं आहेत. 

युरोपमधील सुंदर लोकेशनवर उर्वशीचा हॉट लूक अनेकांना तिच्या प्रेमात पाडत आहे. पिवळ्या साडीमधील उर्वशी अदा सर्वांना वेड लावत आहे. आपल्या लुकला कंपलिट करण्यासाठी मॅचिंग बांगडी, पांढरे कानातले तिचा लूक पूर्ण करतात. तिचा हा बोल्ड लुक सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. (trending news urvashi rautela stunned in europe wearing a sari the user said rishabh bhai look you in marathi)

उर्वशीने 'द लीजेंड' या चित्रपटाद्वारे तमिळमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होतं आहे. 

या व्हिडीओवर यूजर्सकडून अनेक प्रतिक्रिया येत आहे. एका यूजरने म्हटलं आहे की, 'मॅडम, तुम्हाला खूप फुरसतीने बनवले आहे.' दुसऱ्याने कमेंट केलं आहे की, ''ऋषभ भाई, बघा तुम्ही काय मीस केलं आहे ते.''