एका सीननंतर नॅशनल क्रश बनलेली तृप्ती डिमरी लग्न करतेय? तिनंच सांगितलं पती कसा हवा!

Tripti Dimri Wedding Plan : तृप्ती डिमरी सध्या एकीकडे तिच्या चित्रपटामुळे चर्चेत असताना दुसरीकडे तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. आता तृप्तीनं तिच्या लग्नाविषयी आणि होणाऱ्या नवऱ्याविषयी वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 31, 2024, 06:21 PM IST
एका सीननंतर नॅशनल क्रश बनलेली तृप्ती डिमरी लग्न करतेय? तिनंच सांगितलं पती कसा हवा! title=
(Photo Credit : Social Media)

Tripti Dimri Wedding Plan : बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे तिला 'भाभी नंबर 2' म्हणून ओळख मिळाली. तिची आणि रणबीरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्याशिवाय तिचा आणि रणबीरचा इंटिमेट सीन हा देखील चर्चेचा विषय ठरला होता. सगळ्यांमध्ये एकच चर्चा लागली होती. मात्र, आता चर्चा रंगली आहे ते म्हणजे तिच्या लग्नाची. तृप्ती कधी आणि कोणासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. 

खरंतर या चित्रपटानंतर तृप्ती डिमरीला नॅशनल क्रश हा टॅग देखील मिळाला आहे. या चित्रपटानंतर तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स देखील आहे. त्याशिवाय दुसरीकडे फक्त तृप्तीच्या करिअरची चर्चा सुरु झाली नाही तर त्यासोबत तिच्या खासगी आयुष्याची देखील चर्चा सुरु झाली होती. त्यात सध्या सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे तिच्या लग्नाची. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तृप्तीला तिच्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्यात असा प्रश्न विचारण्यात आला. लग्नाविषयीच्या प्रश्नावर उत्तर देत तृप्ती म्हणाली 'लग्नाविषयी मी अजून काही विचार केलेला नाही.' तर त्यानंतर होणाऱ्या नवऱ्याविषयी बोलताना तृप्ती म्हणाली 'मी जास्त काही विचार केला नाही. मात्र, माझी इच्छा आहे की माझा नवरा व्यक्ती म्हणून चांगला असायला हवा.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तृप्ती डिमरीच्या रिलेशनशिपविषयी बोलायचे झाले तर तिचं नाव बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या भावासोबत जोडण्यात आलं होतं. अनुष्काचा भाऊ कर्नेष आणि तृप्ती हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. मात्र, काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेत ब्रेकअप केला. त्यांच्या ब्रेकअपनंतर अशी चर्चा रंगू लागली होती की तृप्ती आता बिझनेसमॅन सॅम मर्चेंटला डेट करते. मात्र, त्या दोघांनी किंवा त्या दोघांपैकी कोणीही या बातमीला दुजोरा दिलेला नाही. 

हेही वाचा : ना ऐश्वर्या, ना कतरिना सलमान खाननं 'या' अभिनेत्रीला मानलेलं लग्नासाठी परफेक्ट बायको!

तृप्तीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती नुकतीच 'ॲनिमल' या चित्रपटात दिसली. यानंतर ती या चित्रपटाचा सिक्वल 'ॲनिमल पार्क' मध्ये दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, ती लवकरच 'आशिकी 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x