Arjun Kapoorकडून सत्य समोर; सांगितले केव्हा करणार Malaika Aroraसोबतत लग्न?

जवळपास गेल्या 3 वर्षांपासून अर्जुन-मलायका  रिलेशनशीपमध्ये आहेत. 

Updated: Apr 20, 2021, 10:53 AM IST
Arjun Kapoorकडून सत्य समोर; सांगितले केव्हा करणार Malaika Aroraसोबतत लग्न?

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांची जोडी कायम चर्चेत असते. जवळपास गेल्या 3 वर्षांपासून ते रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबूली देखील दिली आहे. 2019 साली दोघांनी त्यांच्या नात्याला दुजोरा दिला. दोघांच्या प्रेमाचे किस्से कायम व्हायरल होत असतात. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्यात  असलेल्या वयाच्या अंतरामुळे कायम सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तर काही लग्न केव्हा करणार असा प्रश्न विचारत असतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

आता अर्जुनने चाहत्यांच्या या प्रश्नाचं देखील उत्तर दिलं आहे. 'प्रत्येत नात्यात उतार-चढाव येत असतात आणि नात्यात वाद झाले तर नातं आणखी मजबूत होतं. मी अद्याप लग्नाबद्दल विचार केलेला नाही. लग्न करण्यासाठी दबावही नाही टाकू शकतं नाही. पण जेव्हा तयारी असेल तेव्हा नक्की लग्न करेल.' असं म्हणतं आर्जुनने त्याच्या आणि मलायकाच्या लग्नाबद्दल सांगितलं. 

सेलिब्रिटींच्या गर्दीत प्रकाशझोतात असणारी एक जोडी म्हणजे, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. प्रेमाच्या नात्याला वयाचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं बंधन नसतं हेच या दोघांनी सिद्ध केलं आहे. मुख्य म्हणजे आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही जोडी त्यांच्या प्रेमाची 'खुल्लम खुल्ला' ग्वाही देतात.