टीव्ही अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे.   

Updated: Aug 3, 2020, 12:26 PM IST
टीव्ही अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात title=

मुंबई : संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाख ३ हजार ६९६ इतकी झाली आहे. २४ तासांत देशात ५२ हजार ९७२ जणांना करोना विषाणूची लागण झाली.  देशात आतापर्यंत ११ लाख ८६ हजार २०३ जणं कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आसून अनेकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सर्वसामान्य जनतेपासून ते बड्या सेलिब्रिटिंना देखील कोरोना होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. 

दरम्यान, टीव्ही अभिनेत्री  ऋचा भद्राला देखील कोरोनाची लागन झाली आहे. खुद्द  ऋचाने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे. रविवारी सोशल मीडियाच्या मध्यमातून तिने कोरोना झाल्याची बातमी चाहत्यांना कळवली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hi everyone, I have been tested positive for Covid-19 this morning .. BMC is informed about the same and I am home quarantined at the moment .. although I have mild symptoms, I would advice all those who have been in close proximity with me over the last few days to get themselves tested. Please keep me in your prayers as I set off on my path to recovery. Please be safe and take care #covid19

A post shared by Richa Bhadra (@richabhadra) on

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ती म्हणाली, 'मला करोनाची प्राथमिक लक्षणं जाणवत असल्यामुळे कोरोना चाचणी केली. माझी चाचणी पॉझिटिव्ह आली असून याबाबतीत मी बीएमसीला कळवलं आहे.' शिवाय तिने चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून जे व्यक्ती तिच्या संपर्कात आले असतील त्यांनी देखील स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी असा सल्ला देखील तिने दिला आहे. ऋचा भद्रा 'खिचडी' मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली.