आणखी एक टीव्ही अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन दिली माहिती

Updated: Jul 15, 2020, 12:01 PM IST
आणखी एक टीव्ही अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्रेनू पारीख कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिला कोरोना झाल्याची माहिती तिने दिली आहे. श्रेनूने इंस्टाग्रामवर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पोस्ट केली आहे. रूग्णालयात असून तब्येत बरी असल्याचं तिने म्हटलं आहे.

श्रेनूने लिहिले- काही दिवसांपूर्वी मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. आता मी ठीक आहे. मला आणि माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. या भयानक काळात रुग्णांवर उपचार करणार्‍या कोरोना वॉरियर्सचे मी आभारी आहे.

श्रेनूने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, सावधगिरी बाळगूनही, जर तुमच्या बाबतीत असे घडले, तर मग आपण ज्या अदृश्य राक्षसासोबत लढतो आहे, त्याचा अंदाज लावा. कृपया काळजी घ्या आणि स्वतःचे रक्षण करा.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Even after being so careful if it can get to you then imagine the power of this invisible demon we are fighting with... pls pls be very careful and save urselves!

A post shared by Shrenu Parikh (@shrenuparikhofficial) on

श्रेनूने इश्कबाज, इस प्यार को क्या नाम दूं, दिल बोले ओबेरॉय, ब्याह हमारी बहु का सारख्या शोमध्ये काम केलं आहे. 

बॉलिवूडकरांमध्ये देखील आता कोरोना संसर्ग होताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला. अभिषेकला देखील कोरोना झाला. दोघांवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.