मालिकेचा 'हा' सीन पाहून पोट धरून हसाल...आणि शेवटी कपाळावर हात माराल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सीरियलचा सीन दाखवण्यात आला आहे.हा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

Updated: May 13, 2022, 03:15 PM IST
 मालिकेचा 'हा' सीन पाहून पोट धरून हसाल...आणि शेवटी कपाळावर हात माराल title=

मुंबईः सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सीरियलचा सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये असं काही घडतंय की तुम्हीही डोक्याला हात लावाल.. शोच्या या सीनमध्ये इतकी अतिशयोक्ती करण्यात आली आहे की ते पाहून हसावं की रडावं हा प्रश्न पडतो.

आपल्या देशातील लोकांना मेलोड्रामा खूप आवडतो, त्यामुळेच दरवर्षी टीव्हीच्या जगात अनेक मालिका गाजतात तर कमी टीआरपीमुळे अनेक मालिका फार कमी वेळात चाहत्यांपासून दूर जातात. आपल्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, टीव्ही मालिकांचे निर्माते अनेकदा काहीतरी ट्विस्ट आणतात, परंतु बरेचदा ट्विस्ट आणण्यासाठी निर्माते तर्कशक्तीला फाटा देतात.

अलीकडेच कॉमेडियन वीर दासने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये सीरियलचा एक सीन दाखवण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, अभिनेत्रीचा स्कार्फ पंख्यामध्ये कसा अडकतो आणि तिचा गळा दाबू लागतो. लाख प्रयत्न करूनही अभिनेत्रीचा गळा दाटून येतो आणि अखेर अभिनेता तिचा दुपट्टा दाताने कापून अभिनेत्रीचा जीव वाचवतो.

पण हा व्हिडीओ पाहिल्यास लक्षात येईल की या व्हिडिओमध्ये गळा दाबण्यासारखं काहीही नव्हतं.

हा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने विचारले की ती महिला प्लग का काढत आहे, ती बटण बंद करून पंखा बंद करू शकली असती.

एकाने लिहिले की, तिथे कोणाकडे कात्री नव्हती, त्याने तोंडाने स्कार्फ का कापला?, एका यूजरने असेही म्हटले की हे सर्व कशासाठी?, ती काही पावलं मागेही जाऊ शकली असती. हा व्हिडिओ पाहून अशा अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत, ज्यावर तुम्हालाही हसू येईल.

हा सीन 'स्वरण घर' या टीव्ही शोचा आहे, ज्यामध्ये संगीता घोष, रोनित रॉय, अजय चौधरी आणि वरुण बडोला हे प्रमुख कलाकार आहेत. ही मालिका यावर्षी फेब्रुवारीपासून सुरू झाली. या मालिकेतील मुख्य अभिनेत्री संगीता घोष स्वरणची भूमिका साकारत आहे. लहान मुले कशी मोठी होऊन आपल्या आई-वडिलांना दुखावतात आणि मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करतात हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे.