अक्षयनं दिल्या ट्विंकलला शुभेच्छा... अन् ट्विंकलनं वडिलांना!

अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिचा आज वाढदिवस... याच निमित्तानं पती अक्षय कुमारनंही ट्विंकलला वाढदिवसाच्या 'सोशल' शुभेच्छाही दिल्यात. 

Updated: Dec 29, 2017, 08:19 PM IST
अक्षयनं दिल्या ट्विंकलला शुभेच्छा... अन् ट्विंकलनं वडिलांना!  title=
मुंबई : अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिचा आज वाढदिवस... याच निमित्तानं पती अक्षय कुमारनंही ट्विंकलला वाढदिवसाच्या 'सोशल' शुभेच्छाही दिल्यात. 

ट्विंकल आज आपला ४३ वा वाढदिवस साजरा करतेय. सिने इंडस्ट्रीनंतर लेखणीकडे वळलेली ट्विंकल सध्या साऊथ आफ्रिकेतल्या केपटाऊन शहरात हॉलिडे एन्जॉय करतेय. अक्षयही सध्या तिच्यासोबत आहेत. 

वाढदिवसाच्या निमित्तानं अक्षयनं एका गोड मॅसेजसहीत आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. या फोटोत अक्षय पत्नीसोबत आफ्रिकन पोर्ट सिटीमध्ये गाडी चालवताना दिसतोय. 

 

सोबतच आज, ट्विंकलचे वडील आणि दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचाही वाढदिवस... या दिवशी ट्विंकलनं आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करत वडिलांची आठवण काढली.

Happy birthday Dad

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on