"सनी लिओनी तुझ्या पेक्षा खूप चांगली आहे," Transparent कपडे परिधान केल्यामुळे उर्फी जावेद ट्रोल

Transparent कपड्यांमुळे उर्फी जावेद ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Updated: Jul 20, 2022, 06:54 PM IST
"सनी लिओनी तुझ्या पेक्षा खूप चांगली आहे," Transparent कपडे परिधान केल्यामुळे उर्फी जावेद ट्रोल

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॅशन सेंस आणि तिचे ड्रेस नेहमीच चर्चेत असतात. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याचवेळा उर्फीला तिच्या ड्रेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नुकताच उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

उर्फीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंद्र चावलाने शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फीने काळ्या रंगाचे पारदर्शी कपडे परिधान केले आहेत. तर रस्त्याच्या मधोमध उभं राहून फोटोग्राफर्स उर्फीचा व्हिडीओ शूट करत आहेत. तर उर्फीचा हा लूक पाहून लोकं आश्चर्यचकित झाले आहेत. उर्फीचा हा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी उर्फीला म्हणाला, "असं करते आणि मग यांना इज्जत पाहिजे." दुसरा नेटकरी म्हणाला, "कोण असे कपडे परिधान करतं? ती किती भयानक दिसते." तिसरा नेटकरी म्हणाला, "किती खराब दिसते ही कुठे जाऊन थांबेल काय माहित?" आणखी एक नेटकरी म्हणाला, 'किती बेकार स्त्री आहे ही." दुसरा नेटकरी म्हणाला, "सनी लिओनी तुझ्या पेक्षा खूप चांगली आहे." 

About the Author