VED Box Office Collection 'वेड' नं 50 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर Riteish Deshmukh ची खास पोस्ट व्हायरल

Ved Box Office Collection Day 20 : चित्रपटानं केला चक्क 50 कोटींचा आकडा पार... रितेशन देशमुखनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Jan 19, 2023, 04:50 PM IST
VED Box Office Collection 'वेड' नं 50 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर Riteish Deshmukh ची खास पोस्ट व्हायरल title=

VED Box Office Collection Day 20: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा नुकताच 'वेड' (Ved) हा चित्रपट प्रदर्शित झाला. खासगी आयुष्यात सगळ्यांची चाहती असणाऱ्या या जोडीनं मोठ्या पडद्यावरही जादू केली आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना खरंच वेड लावलं आहे. रितेश आणि जिनिलियाच्या 'वेड' चित्रपटानं प्रदर्शनाच्या इतक्या दिवसांनंतरही त्याचे प्रेक्षकांना वेड लावले आहे. रितेश आणि जिनिलियाच्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनं सगळ्यात लोकप्रिय ठरलेल्या 'सैराट' चित्रपटालाही मागे टाकत एक नवीन विक्रम केला. आता 'वेड' नं कमाईत चक्क 50 कोटींचा गल्ला केला आहे. 

'वेड' चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून 'वेड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 20 दिवसात चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. खरंतर पहिल्या आठवड्यात चित्रपटानं 20.18 कोटी तर दुसऱ्या आठवड्यात 20.67 कोटींची कमाई केली. नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या चित्रपटानंतर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये 'वेड' हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. हा टप्पा गाठल्यानंतर  रितेश देशमुखनं भावूक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यानिमित्तानं रितेशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत रितेशनं चित्रपटाने 50 कोटींचा गल्ला केल्याचे सांगितले. यावेळी रितेश म्हणाला, 'शब्द अपुरे पडत आहेत!!! वेड चिरत्रपटाला मोठ्या मनाने आपण स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार!'

हेही वाचा : Amruta Fadanvis Video : उपमुख्यमंत्र्यांचीच पत्नी करते सरकारी प्रॉपर्टीचा गैरवापर, अमृता फडणवीस ट्रोल

या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) केलं आहे. या चित्रपटातून जिनिलियानं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या पूर्वी जिनिलीयानं हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'वेड' या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर अनेक कलाकार आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. तर जिनिलिया या चित्रपटाची निर्माती आहे.