Pornography Case : 'राज कुंद्राने मला...' गहना वशिष्ठचा मोठा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा पॉर्नोग्राफी चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे.

Updated: Jul 26, 2021, 08:21 AM IST
Pornography Case : 'राज कुंद्राने मला...'  गहना वशिष्ठचा मोठा खुलासा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा पॉर्नोग्राफी चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे. या प्रकरणी रोज नव-नवीन खुलासे होत आहे. राजच्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनेक अभिनेत्रींनी राजविरोधात आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता राज पॉर्नोग्राफी प्रकरणी 'गंदी बात' फेम अभिनेत्री गहना वशिष्ठचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गहनाने अनेक गोष्टींचा खुलासा केला. 

याआधी अश्लिल फिल्म चित्रीत करण्याच्या रॅकेटमध्ये  गहना वशिष्ठचं देखील नाव समोर आलं तिला आज कोर्टात हजर रहायचं होतं, पण ती सध्या भोपाळमध्ये आहे. पण तिने एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिने राज कुंद्राशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गहना व्हिडिओमध्ये म्हणाली, 'राजने माझी मदत केली?' या प्रश्नावर गहना म्हणते, 'मी प्रामाणिकपणे सांगत आहे. राजने माझी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. जेव्हा मी तुरूंगात होते, तेव्हा घरच्यांसोबत बोलण्याची परवानगी नव्हती. कारण फोन  जप्त करण्यात आला होता.' 

पुढे गहना म्हणाली, 'तेव्हा कुंटुबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. पण माझ्या काही मित्रांनी माझी मदत केली. चांगला वकील नेमण्यात आला. प्रचंड पैसा खर्च झाला. पण या सर्व गोष्टींमध्ये राजचा काही संबंध नाही. त्याने माझी मदत केलेली नाही.'

पण आता गहना, राजची मदत करू इच्छित आहे. कारण तिने  या प्रकरणामुळे तुरूंगवास भोगला आहे. 'जे कृत्य मी केलचं नही त्यासाठी मी तुरूंगात गेली आहे. तुरूंगातील जग अत्यंत वेगळं असतं. त्याठिकाणी सर्व प्रकारचे लोक असतात. कोणी खून करून आलेला असतो तर कोणी ड्रग्स केसमुळे आत असतो.'