लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रीची अवस्था मन हेलावणारी; म्हणाल्या '... तो अटॅक'

बऱ्याच दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. तर, काहींची तब्येत ढासळल्याच्या वृत्तानं चाहत्यांना चिंतेत टाकलं. 

Updated: May 6, 2022, 01:16 PM IST
लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रीची अवस्था मन हेलावणारी; म्हणाल्या '... तो अटॅक' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : यंदाच्या वर्षाची सुरुवातच फार चांगली झाली नसल्याचं पाहायला मिळालं. कलाजगतासाठी हे वर्ष काहीसं हादरे देणारं ठरलं. बऱ्याच दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. तर, काहींची तब्येत ढासळल्याच्या वृत्तानं चाहत्यांना चिंतेत टाकलं.  

काही दिवसांपूर्वीही चाहते असेच चिंतेत गर्त झाले. कारण होतं ते म्हणजे एका दिग्गज अभिनेत्रीची बिघडलेली प्रकृती. 

साधारण आठवड्याभरासाठी रुग्णालात दाखल झालेली ही अभिनेत्री म्हणजे मुमताज. आपल्याला काही दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं हे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान माध्यमांना सांगितलं. 

Irritable Bowel Syndrome and Colitis चा त्रास झाल्यामुळं त्यांना अडचणी जाणवल्या शिवाय त्यांना अतिसाराचा झटका आल्याचंही समोर आलं. परिणामी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (Mumtaz discharged )

बरेच उपाय आणि औषधं करुनही अतिसार थांबत नसल्याचं त्यांनी सांगितलं. रुग्णालयात गेलं असता आपल्याला संवेदनशील त्वचेमुळंही काही त्रास झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

'माझ्या त्वचेला दरम्यानच्या काळात बराच त्रास झाला. मुलची इराणची नागरिक असल्यामुळं माझी त्वता फार संवेदनशील आहे', असं सांगत त्यांनी उपचारांची माहिती दिली. 

Mumtaz discharged from hospital after week, says 'it was a sudden attack of...'

सध्या मात्र मुमताज यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. येत्या काळात त्या आरोग्याचीच काळजी घेताना दिसतील. 

74 वर्षीय मुमताज यांनी 1958 मध्ये बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपट विश्वात पदार्पण केलं होतं. तेव्हापासून पुढेही त्या बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकल्या. 1974 मध्ये त्यांनी मयुर माधवानी या व्यावसायिकाशी लग्नगाठ बांधली होती.