close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

म्हणून बॉयकट लूकमध्ये दिसतेय विद्या

चित्रपटाच्या फर्स्ट पोस्टरमध्ये तिची हेअर स्टायल सर्वांचे लक्ष वेधत आहे.

Updated: Sep 16, 2019, 03:58 PM IST
म्हणून बॉयकट लूकमध्ये दिसतेय विद्या

मुंबई : 'मिशन मंगल'च्या दमदार कमाईनंतर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विद्या बालन स्टारर 'शकुंतला देवी' चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट पोस्टरमध्ये तिची हेअर स्टायल सर्वांचे लक्ष वेधत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती ह्यूमन कंप्यूटर साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. गणितांच्या आकड्यांमध्ये रमलेली विद्या चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

 

चित्रपटाच्या पोस्टरसोबतच चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या विद्या अभिनय कौशल्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. खुद्द विद्याने तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून शेअर केला आहे. 

'ह्यूमन कंप्यूटर'च्या नावाने ओळखली जाणारी 'शकुंतला देवी' एक गणिततज्ज्ञ आहे. जी आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर संकणकावर देखील मात करण्यात सक्षम आहे. अवघ्या पाच वर्षांच्या वयामध्ये १८ वर्षांच्या मुलांचं गणित सोडवणाऱ्या 'शकुंतला देवी'यांच व्यक्तिमत्व बायोपिकच्या माध्यमातून उलगडणार आहे.