परदेशातील रस्त्यांवर विरूष्काचा डान्स

सध्या भारतीय क्रिकेट संघ  दक्षिण अफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. टेस्ट, वनडे आणि टी २० अशा तिन्ही स्वरूपाच्या मॅचेस भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दरम्यान खेळले जाणार आहेत. 

Updated: Jan 3, 2018, 01:15 PM IST
परदेशातील रस्त्यांवर विरूष्काचा डान्स  title=

मुंबई : सध्या भारतीय क्रिकेट संघ  दक्षिण अफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. टेस्ट, वनडे आणि टी २० अशा तिन्ही स्वरूपाच्या मॅचेस भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दरम्यान खेळले जाणार आहेत. 

विराट कोहली लग्नानंतर पुन्हा भारतीय संघाचं नेतृत्त्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान मॅच सुरू होण्यापूर्वी विरूष्का दक्षिण आफ्रिकेमध्ये फिरत आहे. दोघांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये काही फोटो सोशल मीडियामध्ये शेअर केले आहेत.  

विरूष्काचा डान्स  

काही दिवसांपूर्वी विरूष्का रस्स्त्यांवर नाचले  होते. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विरूष्का धुंदपणे नाचताना दिसत आहेत.  

हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे ? याबाबत माहिती मिळालेली नाही.  पण हा व्हिडिओ न्युयॉर्कमधील असल्याची माहिती मिळत आहे. 

न्युयॉर्कमधील विरूष्काचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 

 

दक्षिण आफ्रिकेमध्ये विराट कोहली आणि शिखर धवन यांचा देसी भांगडा डांसदेखील व्हायरल होत आहे.  

 

 

विरूष्का एकत्र  

इटलीमध्ये गुप्तपणे लग्न केल्यानंतर विरूष्काने दिल्ली आणि मुंबईत ग्रॅन्ड रिसेप्शन ठेवले होते. त्यानंतर 
लगेजच विराट कोहली सपत्निक भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे.  

तिन्ही स्वरूपाचे सामने रंगणार  

दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा सामना ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पहिला सामना केपटाऊनमध्ये रंगणार आहे. 

तीन टेस्ट मॅच, ६ वनडे आणि ३ टी २० मॅचेस खेळल्या जाणार आहेत. टेस्ट आणि वनडेसाठी एकूण १७ जणांची टीम घोषित केली जाणार आहे.