2018 मध्ये Box Office धमाका, ईद-दिवाळीवर ‘खान’ मंडळींचा कब्जा

गेलं वर्ष भलेही मोठ्या स्टार्ससाठी चांगलं राहिलं नसलं तरी यावर्षी तिनही खान बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. २०१८ मध्ये ईद, दिवाळी आणि ख्रिसमस या तिन्ही उत्सवांमध्ये खान मंडळींचे सिनेमे रिलीज होणार आहेत. 

Updated: Jan 3, 2018, 09:29 AM IST
2018 मध्ये Box Office धमाका, ईद-दिवाळीवर ‘खान’ मंडळींचा कब्जा title=

मुंबई : गेलं वर्ष भलेही मोठ्या स्टार्ससाठी चांगलं राहिलं नसलं तरी यावर्षी तिनही खान बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. २०१८ मध्ये ईद, दिवाळी आणि ख्रिसमस या तिन्ही उत्सवांमध्ये खान मंडळींचे सिनेमे रिलीज होणार आहेत. 

यावर्षीत सलमान खान ‘रेस ३’मधून अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. तर आमिर खान पहिल्यांदाच महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये दिसणार आहे. शाहरूखबद्दल सांगायचं तर यावर्षी शाहरूखने त्याच्या ‘झिरो’ सिनेमाची घोषणा केलीये. 

यावर्षी सलमान खान याचा ‘रेस ३’ ईदमध्ये रिलीज होणार आहे. तेच आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ दिवाळीला रिलीज होणार आहे. आणि ख्रिसमसला शाहरूख खानचा ‘झिरो’ रिलीज होणार आहे.