Vivaah Actress : 'विवाह' चित्रपटातील छोटी बनली मोठी स्टार, आता दिसतेय इतकी बोल्ड

 'विवाह' हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

Updated: Sep 29, 2022, 02:07 PM IST
Vivaah Actress : 'विवाह' चित्रपटातील छोटी बनली मोठी स्टार, आता दिसतेय इतकी बोल्ड title=

मुंबई : 'विवाह' हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात लग्न खूप सुंदर दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात अमृता राव (Amrita Rao) आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) ची जोडी पसंत केली जात आहे. पण या चित्रपटात अमृता रावशिवाय आणखी एक अभिनेत्री आहे. जी खूप चर्चेत राहिली होती. ती म्हणजे अमृता प्रकाश. तिने सिनेमात अमृता रावच्या बहिणीची भूमिका साकारली होती. पण आज तीच अमृता प्रकाश खूप मोठी आणि बोल्डही झाली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिच्या सौंदर्याची जादू स्पष्टपणे दिसून येत आहे.

तिने अमृता रावच्या बहिणीची भूमिका साकारली होती. पण आज तीच अमृता प्रकाश खूप मोठी आणि बोल्डही झाली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिच्या सौंदर्याची जादू स्पष्टपणे दिसून येत आहे.

अमृता खूप बोल्ड आहे
अभिनेत्री अमृता प्रकाश सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती रोज काही ना काही उत्तम पोस्ट टाकत असते. ज्या चाहत्यांना खूप आवडतात. दरम्यान, तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या बोल्ड लूकने सर्वांना घायाळ केलं आहे. बॅकलेस ड्रेसमध्ये असलेल्या अभिनेत्रीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियाचं तापमान वाढलं आहे. 

ब्लाउजशिवाय साडी
फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की अमृता प्रकाशने ब्लाउज न घालता साडी नेसली आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे. जरी या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत फारसं यश मिळवलं नाही, परंतु ती इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. अभिनेत्री अमृता प्रकाशला 'विवाह'मधील तिच्या भूमिकेसाठी चांगलीच पसंती मिळाली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमृताची कारकीर्द
अभिनेत्री अमृता प्रकाशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिने करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपट केले. ज्यामध्ये 'विवाह' व्यतिरिक्त 'तुम बिन', 'कोई मेरे दिल में है', 'मैंने दिल तुझको दिया', 'एक विवाह ऐसा भी' ही नावं आहेत. ही अभिनेत्री सध्या चित्रपट जगतापासून दूर असून तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे. अभिनेत्री अद्याप चित्रपटांमध्ये प्रवेश करण्याच्या मूडमध्ये नाही. पण चाहते तिला पुन्हा चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.