रितेश देशमुखला डोकेदुखीचा त्रास, पत्नीने दिलं असं उत्तर

रितेश देशमुखला का दिलं असं उत्तर 

Updated: Apr 13, 2021, 05:02 PM IST
रितेश देशमुखला डोकेदुखीचा त्रास, पत्नीने दिलं असं उत्तर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख ( Riteish Deshmukh ) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफच्या अपडेट्ससोबतच आपल्या फॅन्सकरता फनी रील्स शेअर करत असतात. रितेशचा फॅन फॉलोइंग वेगळाच आहे. त्याचे एक रील काही तासातच लोकप्रिय होत असतात. त्याने एक रील नुकताच शेअर केला आहे. ( Genelia reaction to husband Riteish Deshmukh headache) 

या रीलमध्ये रितेशची पत्नी जेनेलिया डिसोझा देखील दिसत आहे. व्हिडिओमध्ये रितेश देशमुख आपलं डोकं पकडून बसला आहे. या दरम्यान त्याची पत्नी जेनेलिया डिसोझा विचारते काय झालं? उत्तर देताना रितेश म्हणतो की, काही नाही यार डोकं दुखत आहे. ज्यानंतर जेनेलिया लगेच म्हणते की, कुठे पण.... यावर रितेश मात्र निरुत्तर असतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश देशमुख या व्हिडिओत हैराण होऊन बघत आहे. बॅकग्राऊंडला पीकेचं गाणं सुरू आहे. भगवान कुठे आहेस रे तू? रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा हा रील व्हिडिओ कमाल आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला साडे चार लाखहून अधिक लाइक्स मिळाले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

जेनेलिया आणि रितेश अनेकदा एकमेकांसोबतचे व्हिडिओ शेअर करत असतात. चाहत्यांना देखील त्यांचा हा फनी अंदाज आवडत असतो. जेनेलियानं यंदा रितेशला काय गिफ्ट दिलं याची चाहत्यांना उत्सुकता आहे. कारण, ४० व्या वाढदिवसाला जेनेलियानं रितेशला एक खास गिफ्ट दिलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

'टेस्ला एक्स' ही कार देत तिने रितेशला त्याला सुखद धक्का दिला होता. आपल्या ४० वाढदिवसाला मिळालेली ही 'लय भारी' भेट पाहून त्यानं हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. 'ब्रँड न्यू' कारसोबत रितेशनं त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. ‘४० वर्षाच्या बर्थडे बॉयला २० वर्षाचा असल्याची जाणीव कशी करून द्यायची, हे माझ्या बायकोला बरोबर माहित आहे. असं कॅप्शनही रितेशनं फोटोला दिलं होतं.