नवीन वर्षात या 6 स्टारकिड्सची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

या स्टारकिड्सचा समावेश 

नवीन वर्षात या 6 स्टारकिड्सची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मुंबई : 2018 या वर्षात अनेक स्टारकिड्सने बॉलिवूडमध्ये आपलं नशीब अनुभवलं. काहीजण अगदी पहिल्याच सिनेमांपासून हिट झाले तर काहींनी तसा प्रयत्न केला. यावर्षी सलमान खानची मेहुणा म्हणजे अर्पिता खानचा नवरा आयुष ते अगदी श्रीदेवीच्या जान्हवी कपूरपर्यंत साऱ्यांनी अभिनयात स्वतः पडताळून पाहिलं. 

2019 या नव्या वर्षात देखील अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. यामध्ये 6 स्टारकिड्सचा समावेश आहे. 

खुशी कपूर 

आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच मन जिंकणारी अभिनेत्री श्रीदेवीचं 2018 मध्ये निधन झालं. तिच्या निधनानंतर मोठी मुलगी जान्हवी कपूरचा पहिला सिनेमा धडक यावर्षी प्रदर्शित झाला. चाहत्यांनी हा सिनेमा प्रचंड प्रेमाने स्विकारला. 

आता श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूर देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. याचा खुलासा फिल्ममेकर करण जोहरने स्वतः केला आहे. अशी चर्चा आहे की, खुशी लवकरच अभिनेता जावेद जाफरची मुलगा मिजानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. 

अनन्या पांडे 

अभिनेता चंकी पांडेची मुलगा अनन्या पांडे देखील अभिनेता टायगर श्रॉफसोबत 'स्टुडंट ऑफ द ईअर 2'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात अनन्या पांडेसोबत तारा सुतारिया देखील असणार आहे. या सिनेमाची शुटिंग सुरू झाली आहे. 

तारा सुतारिया 

तारा लवकरच टायगर श्रॉफसोबत 'स्टुडंट ऑफ द ईअर 2' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या सिनेमाची शुटिंग अगदी जोरात सुरू आहे. टायगरसोबत तारा आणि अनन्या असणार आहे. हा सिनेमा पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित करणार असून 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

मिजान जाफरी 

जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी देखील 2019 मध्ये डेब्यू करत आहे. करण नेहा धुपियाच्या चर्चित रेडिओ शो 'नो फिल्टर नेहा' पोहोचला होता. तेव्हा करणने याचा खुलासा केला की, खुशी कपूर आणि मिजान जाफरी सिनेमा जगतात एन्ट्री केली आहे. करणने सांगितलं की, मिजान शानदार काम करणार होता. तो एक पोटेंशिअल बिग स्टार असून जबरदस्त डान्सर आहे.

प्रनूतन बहल 

सलमान खान आपल्या मेहुण्याला लाँच केल्यानंतर आता नूतनची नात प्रनूतन बहलला लाँच करणार आहे. सलमानने स्वतः याचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे. प्रनूतन नात्यात काजोलची भाची असून ती पेशाने वकिल आहे. 

आलिया फर्नीचरवाला 

1992 मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा 'जो जीता वही सिंकदर' या सिनेमातून पूजा बेदीने डेब्यू केला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरला पण पूजाचं करिअर फार उंची गाठू शकलं नाही. पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला लवकरच सिनेमात डेब्यू करण्यास सज्ज आहे. 

आलिया अभिनेता सैफ अली खानसोबत 'जवानी जानेमन'मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नितीन कक्कड यांनी केलं आहे.