लग्न, लग्न म्हणजे काय असतं? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

लग्नाचा खरा अर्थ समजून घ्या 

Updated: Sep 20, 2019, 10:34 AM IST
लग्न, लग्न म्हणजे काय असतं? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर कायमच चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन मिळतं. लग्न म्हणजे नेमकं काय असतं? हा आताच्या तरूणाईला पडलेला प्रश्न कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. लग्न करून तरी काय फायदा? लग्न का करायचं? घटस्फोटाचं प्रमाण इतकं असताना लग्न का करायचं? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जातात. 

पण या प्रश्नावर उत्तर मिळणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. झी मराठीवरील 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतील अभिजीत राजे आणि आसावरी म्हणजे गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांचा हा व्हिडिओ आहे. 

लग्न म्हणजे दोघांचा संसार. लग्न म्हणजे वाद-विवाद. यासगळ्या संकल्पनांना बाजूला सारत लग्न म्हणजे नेमकं काय? हे या व्हिडिओत सांगितलं आहे. अभिजीत राजेंनी सांगितलंय की, लग्न म्हणजे जेवताना कुणाची तरी सोबत, बाईकवर कुणीतरी हक्काने मागे बसणार यासारखी प्रेमळ भावना म्हणजे लग्न. 

 झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अगोदर देखील या मालिकेतील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये आई नेमकं घरात काय करते? या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं होतं. हा व्हिडिओ खासदार  स्मृती इराणी यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.