मुंबई : बॉलिवूडची डिंपल गर्ल अभिनेत्री प्रीती झिंटा अभिनयापासून दूर आहे. प्रिती रूपेरी पडद्यावर सक्रीय नसली तर सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. सध्या प्रिती तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण जिया आणि जय दोन मुलांसोबत मोकळेपणाने जगत आहे. प्रितीने आता तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिच्या दोन मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोत मुलांचा चेहरा दिसत नसला तरी प्रीतीचा मुलांसोबतचा हा फोटो चाहत्यांची मनं जिंकत आहे.
मुलांचा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'मुलांसोबत पहिला चित्रपट....ओएमजी बच्चन तुम्ही आमचा शनिवार मजेदार बनवला आहे. किलर परफॉर्मन्स आणि काय मस्त चित्रपट.' असं लिहिलं आहे. या शिवाय प्रितीने अनेक थंब्स अप इमोजीही पोस्ट केल्या आहेत.
अभिनेता अभिषेक बच्चन स्टारर 'बॉब बिस्वास' सिनेमा प्रितीने तिच्या मुलांसोबत पाहिला. प्रितीच्या मुलांनी सर्वात पहिला 'बॉब बिस्वास' सिनेमा पाहिला आहे. त्यामुळे प्रितीच्या मुलांचं आणि अभिषेकसोबत एक वेगळ नातं तयार झालं असं म्हणायला हरकत नाही.
प्रिती आणि अभिषेकने देखील अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. प्रीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने 1998 मध्ये 'दिल से' सिनेमात काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर प्रितीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अनेकांच्या मनात तिने घर देखील केलं पण 2018 पासून ती कोणत्याही सिनेमात दिसलेली नाही.