Aishwarya Rai Bachchan Bodyguard Salary: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्याने देखील प्रेक्षकांना घायाळ करत असते. सतत सोशल मीडियावर ऐश्वर्या राय चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटासंदर्भात अनेक बातम्या देखील सोशल मीडियावर आल्या होत्या. मात्र, त्या सर्व अफवा असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
अशातच आता पुन्हा एकदा ऐश्वर्या राय बच्चन चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. या कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या बच्चन देखील दिसली होती. त्यासोबत ऐश्वर्या आणि आराध्या यांची सुरक्षा करणारे बॉडीगार्ड देखील दिसले होते. पण तुम्हाला माहिती आहे का की सावलीप्रमाणे सुरक्षा करणाऱ्या बॉडीगार्डला ऐश्वर्या राय किती पगार देते?
ऐश्वर्या राय बच्चनच्या बॉडीगार्डचा पगार किती?
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या बॉडीगार्डचे नाव शिवराज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवराज बच्चन कुटुंबासाठी काम करतो. त्यांच्यासाठी तो कुटुंबातील सदस्यापेक्षा कमी नाही. शिवराजचा ऐश्वर्या राय खूप आदर करते. शिवराज ऐश्वर्या रायसह बच्चन कुटुंबचा विश्वासू आहे. तो ऐश्वर्या राय बच्चनला सुरक्षा पुरवतो. शिवराज ऐश्वर्याबरोबर प्रत्येक इव्हेंटला जात असतो. तो टेक्निकल एक्सपर्ट आहे. बच्चन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेसाठी वेगळे बॉडीगार्ड आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चनच्या बॉडीगार्डचा मासिक पगार 7 लाख रुपयांच्या आसपास आहे. याशिवाय ऐश्वर्या राय बच्चनच्या दुसऱ्या बॉडीगार्डचे नाव राजेंद्र ढोले आहे. फिल्मी बीटनुसार, राजेंद्र ढोले याचा वार्षिक पगार एक कोटी रुपये आहे.
अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचा पगार किती?
अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचे नाव जितेंद्र शिंदे आहे. जितेंद्र शिंदे नेहमी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबासोबत असतो. मग ते त्यांचे परदेश दौरे असो किंवा शूटिंगची ठिकाणे. जितेंद्र शिंदे स्वत:ची सुरक्षा एजन्सीही चालवतो. त्याचा वार्षिक पगार सुमारे दीड कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.