close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बिग बींना जया बच्चन असं काही म्हणाल्या होत्या की...

विश्वासच बसणार नाही... 

Updated: Oct 14, 2019, 08:01 PM IST
बिग बींना जया बच्चन असं काही म्हणाल्या होत्या की...

मुंबई : सेलिब्रिटी जोड्यांची नावं घेण्यास सुरुवात केल्यावर काही नावं आपोआपच पुढे येतात. अशाच नावांपैकी एक म्हणजे, अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन. अमिताभ आणि जया बच्चन यांनी आज कित्येक वर्षे एकमेकांना साथ दिली. त्यांच्यातील याच सुरेख नात्याची झलक जवळपास अनेक वर्षांपूर्वीच्या एका मुलाखतीत पाहायला मिळत आहे. बीबीसीची ही मुलाखत असल्याचं कळत आहे. 

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानंतर लगेचच या मुलाखतीचा व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधत आहे. बिग बींसोबतच विवाहबंधनात अडकल्यानंतर आणि मुलं झाल्यानंतर जया यांनी कलाविश्वातून काही काळ दूर राहण्याला प्राधान्य दिलं. याचविषयी सांगताना जया यांनी या मुलाखतीत बिग बींचा उल्लेख एक लहान मुल म्हणून केला होता. मुलाखतकार आणि अमिताभ यांची खिल्ली उडवत जया म्हणाल्या होत्या, 'मला तीन मुलांचं संगोपन करावं लागतं.... (इथे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता अभिषेक, श्वेता आणि खुद्द अमिताभ बच्चन)

बिग बींना 'लहान मुल' म्हणून संबोधणाऱ्या जया यांचा हा खोडकर अंदाज या मुलाखतीला आणखी रंगतदार करुन गेल्याचं पाहायला मिळत आहे.

मुलांना जास्त वेळ न देता येत असल्याची खंत 

सततची कामं, चित्रीकरण, मुलाखती या साऱ्यामध्ये मुलांना आपण अपेक्षित वेळ देत नसल्याचंही त्यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं. पण, मुळात शक्य तितका जास्त वेळ ते मुलांसोबत व्यतीत करतात. हे मुलांच्या वागण्याबोलण्यातूनच कळतं की त्यांच्यावर व़डिलांची किती छाप आहे, असं म्हणत जया बच्चन बिग बींना धीर देतात, त्यांची पाठराखण करतात.