'या' कारणामुळे शाहरूख चंकी पांडेचा कायम ऋणी, सांगितलं कारण

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अनन्या पांडे अडकणार 

Updated: Oct 22, 2021, 01:19 PM IST
'या' कारणामुळे शाहरूख चंकी पांडेचा कायम ऋणी, सांगितलं कारण

मुंबई : जेव्हापण मैत्री किंवा प्रेमाबद्दल बोललं जातं तेव्हा शाहरूख खानचं नाव पहिलं घेतलं जातं. बॉलिवूडचा किंग खान झाल्यानंतरही शाहरूख लोकांना विसरलेला नाही. कठीण प्रसंगात ज्या लोकांनी त्याला मदत केली त्यांची जाणीव आजही शाहरूखला आहे. अशीच जाणीव शाहरूख खानने चंकी पांडेची ठेवली आहे. शाहरूख चंकी पांडेचा कायमच ऋणी आहे. 

खूप कमी लोकांना वाटतं माहित आहे की, शाहरूख सलमानला आपला चांगला मित्र मानतो. अगदी तसंच तो चंकी पांडे आणि त्याच्या कुटुंबाला आपल मानतो. चंकी पांडे आणि शाहरूख खान हे अगदी चांगले मित्र आहेत. 

अगदी मुलांमध्ये देखील झळकते ही मैत्री 

अशीच काहीशी मैत्री चंकी आणि शाहरुखच्या मुलांमध्ये दिसून येते. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ही शाहरुखची मुलगी सुहानाची बेस्ट फ्रेंड आहे. अनन्या केवळ सुहानाचीच नाही तर आर्यन खानची चांगली मैत्रीण आहे. पण आज आर्यन ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे आणि अनन्याचे नाव सुद्धा याच प्रकरणात बाहेर येत आहे. पण अशा परिस्थितीतही अनन्या आणि तिच्या कुटुंबाने शाहरुखचे कुटुंब सोडले नाही.

चंकीने शाहरूखला राहण्यासाठी दिली होती जागा 

चंकी पांडे शाहरुख खानचा मोठा आधार बनला आणि त्याला इंडस्ट्रीमध्ये रूळण्यास मदत केली. शाहरुख आणि चंकी पांडेची मैत्री 80 च्या दशकात सुरू झाली जेव्हा शाहरुख करिअर करण्यासाठी मुंबईत आला. त्यावेळी चंकी पांडे हा टॉप स्टार्सपैकी एक होता आणि खूप चित्रपट करत होता. चंकीने त्याला त्याच्या घरात आश्रय कसा दिला हे शाहरुखने सांगितले होते. संघर्षाच्या दिवसात तो चंकी पांडेच्या घरी राहिला.

त्या दिवसात चंकी पांडे हे एक मोठे नाव होते आणि तो जिथे जायचा तिथे शाहरुखला सोबत घेऊन जायचा. त्यानंतर त्याने शाहरुखला इंडस्ट्रीतील लोकांशी ओळख करून दिली आणि त्याची ओळख झाली. असे म्हटले जाते की चंकी पांडेने शाहरुखला कारकीर्द सुरू करण्यास मदत केली.

चंकी पांडेमुळेच शाहरुख चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करू शकला आणि यासाठी तो चंकीचा आयुष्याभरासाठी आभारी राहील. शाहरुखने चंकी पांडेचे अनेक प्रसंगी कौतुक केले. तो म्हणतो, 'चंकी माझा चांगला मित्र आहे.' कालांतराने शाहरुख आणि चंकी पांडे यांची मैत्री आणि नातेसंबंध अधिक दृढ झाले आणि त्यांच्या मुलांमध्येही तेच बंधन दिसून येते. शाहरुख आणि चंकीची मुले म्हणजे आर्यन, सुहाना आणि अनन्या हे जवळचे मित्र आहेत. शाहरुख आणि चंकीच्या बायका म्हणजेच गौरी खान आणि भावना पांडे सुद्धा चांगल्या मैत्रिणी आहेत.