तुम्हाला विश्वास बसणार नाही Shaka Laka Boom Boom मधील संजू आता कसा दिसतो

19 वर्षांपूर्वी आलेला 'शक लाका बूम बूम' हा शो प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस पडला होता.

Updated: Oct 26, 2021, 09:48 PM IST
तुम्हाला विश्वास बसणार नाही Shaka Laka Boom Boom मधील संजू आता कसा दिसतो

मुंबई : 19 वर्षांपूर्वी आलेला 'शक लाका बूम बूम' हा शो प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस पडला होता. हा शो मॅजिक पेन्सिलवर आधारित होता. जो त्यावेळी मुलांना हा शो प्रचंड आवडायचा. विशेष म्हणजे या शोमध्ये दिसणारे अनेक बाल कलाकार आज इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार बनले आहेत. यापैकी एक म्हणजे किंशुक वैद्य, जो या शोमध्ये संजूची भूमिका साकारत होता. त्याने या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. किंशुक वैद्य आज कुठे आहेत आणि किती मोठा झाला आहे आणि तो सध्या काय करतोय या बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अभिनयात आपलं नशीब आजमावत आहे
किंशुक वैद्यला शक लाका बूम बूममधील भूमिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. याचबरोबर संजूच्या भूमिकेत किंशुकला चांगलीच पसंती मिळाली होती. शोच्या कथेमध्ये, संजूला एक जादूची पेन्सिल मिळते, त्यानंतर तो ही पेन्सिल एखाद्याची मदत करण्यासाठी वापरतो. याआधी किंशुकने अजय देवगणच्या राजू चाचा या चित्रपटातही काम केलं होतं. आज हा छोटा कलाकार खूप मोठा झाला आहे. किंशुक 28 वर्षांचा आहे जो अजूनही अभिनय क्षेत्रात आहे. राधा कृष्ण, एक रिश्ता साझेदारी का मध्ये त्याचं पात्र खूप पसंत केलं गेलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हंसिका मोटवानी आणि जेनिफर विंगेट देखील या शोचा भाग होत्या
विशेष बाब म्हणजे हंसिका मोटवानी आणि जेनिफर विंगेट सुद्धा शाका लाका बूम बूम मध्ये बालकलाकारांच्या भूमिकेत दिसल्या होत्या. आणि आज या दोघीही मनोरंजन विश्वात मोठं नाव बनल्या आहेत. हंसिका चित्रपटांमध्ये नेहमी सक्रिय असते, तर जेनिफर विंगेट हे देखील टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. जेनिफर अनेक हिट मालिकांमध्ये दिसली आहे आणि ती इंडस्ट्रीतील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.