'तू आहेस तरी कोण?' करीनाच्या वक्तव्यावर दिया मिर्झाची नाराजी

बॉलिवूडवर कपूर कुटुंबाचं राज्य; कुटुंबातील मुलगी करीनाची सर्वत्र दादागिरी

Updated: Oct 20, 2021, 08:58 AM IST
'तू आहेस तरी कोण?' करीनाच्या वक्तव्यावर दिया मिर्झाची नाराजी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत 'रेफ्यूजी' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये आल्यापासून तिच्याविषयी अनेक चर्चा रंगू लागल्या. तेव्हा वादाच्या भोवऱ्यात असणारी अभिनेत्री आता बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. एवढंच नाही तर करीना कोणत्याही सेलिब्रिटीला कधीही काहीही बोलते. जे तिच्या मनात असतं ते ती सडेतोडपणे बोलून दाखवते. 

एकवेळ अशी होती जेव्हा करीनाने अभिनेत्री दिया मिर्झाला रागात 'तु आहेस तरी कोण?' असा प्रश्न विचारला.  काही वर्षांपूर्वी दिया आणि करीनामध्ये खूप दुरावा होता. काही आउटफिटबाबत त्यांच्यात बाचाबाची झाली. दिया आणि करीनासोबत मनीषा आणि नम्रता देखील तिरंगा घेवून एका इव्हेन्टमध्ये सहभागी होणार होत्या. 

तेव्हा करीनाने सलवार-सूट घालण्यास नकार दिला. करीनाला लेहेंगा घालायचा होता. जो तिने स्वतः तयार करून घेतला होता. करीनाच्या या हट्टानंतर नम्रता करीना आणि दियाला एका खोलीत सोडून निघून गेली. तेव्हा करीना दियावर ओरडू लागली. दियाने सर्व घडलाप्रकार फिल्मीबिटला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. 

दिया म्हणाली, 'अचानक काही असं झालं... करीना माझ्यावर जोरजोरात ओरडू लागली.. तु आहेस तरी कोण? नम्रताला सल्ला देणारी तु कोण आहेस?' तेव्हा मी प्रचंड नाराज झाली.  मी त्या खोलीतून काही न बोलताचं बाहेर आली... तेव्हा मला कळालं करीना कोणावरही ओरडू शकते...' आता करीना आणि दिया दोघी त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेल्या आहेत...