मुंबई : कोरोना काळात अभिनेता सोनू सूदने प्रत्येक गरजूला मदत केली. आज देखील तो अनेकांच्या मदतीला धावून जातो. सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू कोरोना काळत अनेक गरिबांचा हिरो झाला. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्याने फक्त लोकांची मदत केली. त्यामुळे तो तुफान चर्चेत आला. समाजसेवेसाठी कित्येकांनी सोनूचं कौतुक केलं, तर अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केले. नुकताचं एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सोनूने अनेक गोष्टींचा खुलासा केला.
यावेळी सोनूला य सर्व कामांसाठी तुला पैसे कोण पुरवतं? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सोनू म्हणाला, 'जर कोणी चांगलं काम करत असेल, तर त्यामध्ये अडथळे आणणारे अनेक असतात.' याठिकाणी सोनूने एक उत्तम दाखला दिला. पाप करण्यासाठी देखील शस्त्र असतात असं तो म्हणाला.
'पाप करण्यासाठी शस्त्र असतात. ज्यामुळे चांगलं करणाऱ्यांवर वार केले जातात. मला देखील अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण मी माझं लक्ष्य सोडलं नाही. माझ्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. पण काही सापडलं नाही. त्यांनी माझ्या घरी येवून पाहिलं आहे. माझ्याकडे पैसे कसे येतात. माझ्या घरा बाहेर तेव्हा देखील 20-250 लोक उभे असयाचे आणि आज देखील असतात. '
यासोबतच सोनूने भविष्यात राजकारणात येण्याचेही सांगितले. भविष्यात आपण राजकारणाचा भाग होऊ शकतो, असे तो म्हणाले, परंतु सध्या राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.