मुंबई : 'ब्लॅकमेल' या सिनेमांत अभिनेता इरफान खानच्या भूमिकेचं भरभरून कौतुक होतंय. काहीच दिवसांपूर्वी इरफान खानच्या आजारपणाची बातमी आली. इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचं समजलं. चाहत्यांना ही बातमी कळताच धक्का बसला. आता इरफान खानच्या ब्लॅकमेल या सिनेमांतील कोस्टारने त्याच्या तब्बेतीबाबत काय सांगितलं ते पाहू.
अभिनेता अरूणोदय सिंह इरफान खानसोबत ब्लॅकमेल या सिनेमांत काम केलं आहे. आजाराबाबत बोलताना अरूणोदय म्हणाला की, इरफान खान एका दुर्मिळ आजारासोबत झगडत आहे. पण इरफान एक कठोर व्यक्ती आहे. तसेच इरफान खानच्या आजाराबाबत चुकीचं बोलणं बंद करा. आपण त्याच्या तब्बेतीसाठी प्रार्थना करू.
अभिनय की बॉक्सऑफिसवरील कलेक्शन, कलाकाराला कशाची मदत मिळते? हा प्रश्न किर्तीला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना किर्ती म्हणाली, " दोन्ही कलाकारांना मदत करते. परंतू ही गोष्ट व्यक्ती सापेक्ष आहे.
कीर्तीच्या म्हणण्यानुसार, 'माझं काम चांगलं आहे. पण ते बॉक्सऑफिसवर चांगलं कलेक्शन मिळवून देण्यासाठी मदत करत नसेल तर भविष्यात मला नवं काम मिळण्याची शक्यता कमी होते.' पण ब्लॅकमेक हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कामगिरी करेल. असे त्यांनी म्हटले आहे. कीर्ती कुल्हारी नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. लवकरच ती विनोदी चित्रपटामध्ये झळकणार आहे. यापूर्वी कीर्तीने 'पिंक',' इंदू सरकार' अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.