असं काय घडलं की बिग बींची नात म्हणते, Acting चं करिअर नको रे बाबा 

नव्याने आपले वडिल निखिल नंदा यांच्या बिझनेसमध्ये उडी घेतली.

Updated: Mar 10, 2022, 03:49 PM IST
असं काय घडलं की बिग बींची नात म्हणते, Acting चं करिअर नको रे बाबा  title=

मुबंई : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाला घेवून काही वर्षांपुर्वी असं म्हटलं जायचं की, ती बॉलिवूडमध्ये आपली जागा बनवू शकते. मात्र ही बाब खोटी आहे. नव्याने आपले वडिल निखिल नंदा यांच्या बिझनेसमध्ये उडी घेतली आणि ती बिझनेसवुमन बनली. आता नव्याने आपल्या करिअरला घेवून बरेच खुलासे केले आहेत. 

नव्याने सांगितलं की, ''मला मुळात एक्टर कधीच बनायचं नव्हतं. मला डान्सिंगची आवड होती. मात्र मी याला घेवून कधी सिरियसदेखील नव्हती की मी यामध्ये  कधी करिअर करेन.मला नेहमी बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता. माझी आजी आणि काकी दोघीं वर्कींग वूमन आहेत. त्या पण दोघी फॅमेली बिझनेसमध्ये सक्रिय आहेत. मी नंदा खानदानची चौथी जनरेशन आहे. आणि मी खुशी-खशी या बिझनेसला पुढे नेऊ ईच्छिते.''

मला माझ्या वडिलांना प्रत्येक गोष्टीत साथ द्यायची आहे. एक महिला असल्याने मला व्यवसायाला पुढे नेण्यासाठी खूप अभिमान वाटेल. पण, मात्र एक्टिंग अशी गोष्ट नाही की ती मी कधीही करु शकते.नव्याचं बोलणं ऐकून आई श्वेता म्हणाली, तुला कदाचित फार कमी काळ वाटेल की, अभिनयही तुझ्यासाठी करिअर होऊ शकत नाही. मला दोन्ही मुलांची काळजी वाटते. आम्हाला खूप सवलती मिळाल्या आहेत आणि सर्वांच्या नजरा नेहमीच आमच्याकडे असतात.

माझे वडील वयाच्या 80 व्या वर्षी खूप कष्ट करतात जेणेकरून आपण चांगलं जीवन जगू शकू. सकाळी ५ वाजता उठणे आणि रोज तेच काम करणं सोपं नाही.'' श्वेता ही अमिताभ आणि जया यांची मोठी मुलगी आहे. श्वेताला नव्या आणि अगस्त्य अशी दोन मुलं आहेत. श्वेताचं लग्न एस्कॉर्ट्स कंपनीचे मालक निखिल नंदासोबत झालं आहे.