'खेळ अद्याप संपलेला नाही...' असं म्हणत मुलीसमोर का रडले अमिताभ बच्चन?

Why Amitabh Bachhan cry front of the daughter  बिग बींवर का आली नात आणि मुलीसमोर रडण्याची वेळ Amitabh Bachhan, Navya Naveli Nanda, Shweta Bachhan, Bollywood update, Bollywood News

Updated: Nov 29, 2021, 02:20 PM IST
'खेळ अद्याप संपलेला नाही...' असं म्हणत मुलीसमोर का रडले अमिताभ बच्चन?

मुंबई : गेल्या 21 वर्षांपासून महानायक अमिताभ बच्चन यांनी 'कोन बनेगा करोडपती' सिनेमाच्या माध्यमातून अनेकांच्या स्वप्नांना पंख लावले. प्रश्न-उत्तरांच्या या खेळात अनेकांना त्याचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत मिळाली. पाहाता-पाहाता शोने एक हजार एपिसोड पूर्ण केले आहेत. आनंदाच्या मुहूर्तावर 'केबीसी'च्या मंचावर त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 'केबीसी' शोचे एक हजार एपिसोड आणि मुलगी, नातीला एकत्र पाहिल्यानंतर बिग बी चक्क रडू लागले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या 'केबीसी' शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये श्वेता, बिग बींना विचारते, 'पाप्पा, तुम्हाला विचारायचं आहे, 'केबीसी'चे एक हजार एपिसोड पूर्ण झाले आहेत. तुम्हाला कसं वाटत आहे.' यावर बिग बी म्हणाले, 'संपूर्ण जग बदललं असल्या सारखं वाटत आहे...' सध्या प्रोमो तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओच्या शेवटी बच्चनही भावूक होताना दिसले. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि आवाजात जडपणा होता. भावनिक क्षणातही बिग बी हसतात आणि म्हणतात, 'ठीक आहे. चला खेळ पुढे नेऊ, कारण खेळ अद्याप संपलेला नाही....