.... यामुळे सलमान खान करतो गणपतीची पूजा

काय आहे खरं कारण 

.... यामुळे सलमान खान करतो गणपतीची पूजा

मुंबई : दरवर्षी मनोभावे बॉलिवूडचा दबंग सलमान खान गणेश चतुर्थी अगदी मनापासून साजरी करतो. गेल्यावर्षी सलमान खान अबू धाबीवरून फक्त मुंबईत गणेशोत्सवासाठी आला होता. त्यावेळी सलमान टायगर या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. गणेश चतुर्थीच्या दिवसांत सलमानचा संपूर्ण परिवार एकत्र असतो. यावर्षी देखील सलमान हा सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करणार आहे. 

सध्या सलमान खान बिग बॉस 12 च्या संदर्भात बिझी आहे. हा शो याच आठवड्यात सुरू होणार आहे. त्यानंतर सलमान खान भारत या सिनेमाची शुटिंग पूर्ण करणार आहे. यानंतरच शेड्युल हे अबू धाबीमध्ये असणार आहे. आता अशी देखील चर्चा आहे की, कतरिना कैफ देखील सलमानसोबत हा सण साजरा करणार आहे. गेल्या 14 वर्षांपासून सलमान खानच्या घरी गणपती विराजमान होतो. मात्र गेल्यावर्षी हा ट्रेंड तोडण्यात आला आणि अर्पिता खानच्या घरी बाप्पा विराजमान कऱण्यात आला. संपूर्ण कुटुंब अर्पिताच्या घरी पोहोचले होते. खूप उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यंदा देखील सलमान आपल्या बाप्पाच्या तयारीसाठी लागला आहे. 

या भीतीमुळे सलमान खान साजरा करतो गणेशोत्सव 

यापुढे सलमान खान आपला गणेशोत्सव साजरा करणं टाळणार नाही. कारण 2016 मध्ये त्याला मोठा फटका बसला होता. 2016 मध्ये ट्यूलाइट या सिनेमाच्या शुटिंगवेळी सलमानने बाप्पाची पूजा मिस केली होती. आणि त्यावर्षी हा सिनेमा जोरदार आपटला होता. एवढंच काय तर दबंग खानला डिस्ट्रीब्यूटर्सचे पैसे परत करावे लागले होते. त्यामुळे यंदा त्याने असं शेड्यूल ठेवलं आहे की, बाप्पाची पूजा करूनच यापुढचं भारत सिनेमाचं शुटिंग पूर्ण करणार आहे.