करिश्मा कपूर पुन्हा लग्न करणार?

गेल्या कित्येक वर्षांपासून करिश्मा कपूर चित्रपटांपासून लांब असली तरी तिच्याबद्दल चर्चा मात्र आजही होत आहे.

Updated: Nov 8, 2017, 10:44 PM IST
करिश्मा कपूर पुन्हा लग्न करणार?

मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून करिश्मा कपूर चित्रपटांपासून लांब असली तरी तिच्याबद्दल चर्चा मात्र आजही होत आहे. कधी फोटोंमुळे तर कधी अन्य कारणांमुळे करिश्मा चर्चेचा विषय ठरते. यावेळी मात्र वेगळ्याच कारणासाठी करिश्माची चर्चा होत आहे. करिश्माचा कथित बॉयफ्रेंड संदीप तोषनीवालानं त्याची पत्नी अश्रितासोबत घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे करिश्मा आता लग्नाचा निर्णय घेणार असल्याचं गॉसिप सुरु आहे.

मागच्या तीन वर्षांपासून दिल्लीचे उद्योगपती असलेल्या संदीप तोषनीवाला यांना करिश्मा डेट करत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. संदीप आणि त्यांची पत्नी अश्रितानी २०१०मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता ७ वर्षांनी वांद्र्याच्या कुटुंब न्यायालयानं घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं.

घटस्फोटानंतर संदीप अश्रिताला २ कोटी रुपये देणार आहे. याचबरोबर अश्रिता दिल्लीतल्या ज्या घरात राहते, ते घरही अश्रिताच्या नावावर होणार आहे. या दोघांची ९ वर्षांची आणि १२ वर्षांची मुलगी अश्रिताबरोबरच राहणार आहे. संदीपनं ३-३ कोटी रुपयांची संपत्ती दोन्ही मुलींच्या नावावर केली आहे.

करिश्मा कपूरनं दिल्लीचे उद्योगपती असलेल्या संजय कपूरबरोबर लग्न केलं होतं, पण दोघांनी घटस्फोट घेतला. करिश्मा आणि संजयला दोन मुली आहेत. आता संदीपला घटस्फोट मिळाल्यामुळे लवकरच दोघांचं लग्न होईल, असं बोललं जात आहे. करिश्मा आणि संदीप अनेकवेळा कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे दोघं अनेक पार्टीमध्येही एकत्र गेल्याचं पाहायला मिळालं आहे.