यामीने लग्नात नेसली 33वर्ष जुनी साडी; काय आहे साडीचं सिक्रेट

गुपचूप झालेलं हे लग्न सोशल मीडियावर मात्र तुफान गाजलं. 

Updated: Jun 11, 2021, 08:10 AM IST
यामीने लग्नात नेसली 33वर्ष जुनी साडी; काय आहे साडीचं सिक्रेट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गैतमने (Yami Gautam) नुकताचं दिग्दर्शक आदित्य धर ( Aditya Dhar)सोबत लग्न केलं आहे. अतिशय गुपचूप झालेलं हे लग्न सोशल मीडियावर मात्र तुफान गाजलं. आज देखील चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याची चर्चा असते. यामीचं लग्न साध्या पद्धतीत झालं असलं तरी यामीच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं.  लग्नातील यामीचा खास अंदाज सर्वांच्या पसंतीस पडला. अशात यामीच्या लग्नाबद्दल एक सिक्रेट समोर आलं आहे. 
 
लग्नात यामीने ज्याप्रकारे सिंपल मेकअप केला होता, त्यावर तिने  सिल्क साडी नेसली  होती. तर यामीच्या लग्नाचं सिक्रेट म्हणजे तिने  लग्नात आई अंजलीची 33 वर्ष जुनी पारंपरिक साडी नेसली होती. पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार यामीने आईच्या साडीसह आजीची ओढणी देखील घेतली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)

मिळालेल्या माहितीनुसार; यामीचं मेकअप कोणत्या मेकअप आर्टीस्टने नाही तर स्वतःयामीने केलं होतं. तर यामीची हेअर स्टायल तिची बहिण सुरीली गौतमने केली होती.  ज्याप्रमाणे प्रत्येक जण लग्नात लाखो रूपये खर्च करतो, पण यामीने फार कमी खर्चात लग्न उरकलं आहे. त्यामुळे यामीने पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलं आहे. 

यामीने 'उरी' या सिनेमातून आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. यामीने हिंदीसह तामिळ आणि तेलुगु सिनेमांमध्येही अनेक भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. यामीने एका ब्युटी प्रोडक्टच्या जाहिरातीतून लोकांसमोर आली होती. यानंतर तिने गरुडभरारी घेतली.