स्वीटूच्या घायाळ करणाऱ्या अदांनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

मालिका विश्वात पाऊल ठेवण्यासाठी अन्विताने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केली आहे. त्यात 'गर्ल्स' या सिनेमातील तिचा रोल चांगलीच गाजला होता.

Updated: Jun 27, 2021, 07:39 PM IST
स्वीटूच्या घायाळ करणाऱ्या अदांनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

मुंबई | अभिनेत्री अन्विता फलटणकर, जिच्या क्यूट अंदाजावर सध्या सगळेच फिदा आहेत. अन्विता अर्थात 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील सगळ्यांची लाडकी स्वीटू, जी सोशल मीडियावर देखील तितकीच अॅक्टीव्ह असते.अन्विताच्या अभिनयासह तिच्या एकापेक्षा एक अशा डान्स व्हिडिओंची देखील तितकीच चर्चा पाहायला मिळते.

शुटींगमधून वेळ मिळाला की अन्विता नवनवीन डान्स व्हिडिओ शूट करुन आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना दिसते. अभिनयासह अन्विताला डान्सची देखील भारी आवड आहे. त्यात नुकताच अन्विताने एक नवा डान्स व्हिडिओ पोस्ट केलाये. ज्यात अन्विताच्या घायाळ करणाऱ्या अदांनी साऱ्याचंच लक्षवेधून घेतलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anvita Phaltankar (@anvita_phaltankar)

सोबतच पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेसमध्ये अन्विता आणखीनंच खुलून दिसतेयं.तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत पसंती दर्शवलीये. अन्विताने 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून स्मॉल स्क्रिनवर एन्ट्री केली आणि आज घरघरात क्यूट स्वीटू पोहोचली.

मालिका विश्वात पाऊल ठेवण्यासाठी अन्विताने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केली आहे. त्यात 'गर्ल्स' या सिनेमातील तिचा रोल चांगलीच गाजला होता.