सगळ्यांची क्रश असलेल्या दीपिकासोबत युवीचं का झालं ब्रेकअप?

क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातील नात कायम चर्चेत असतं.

Updated: Jun 8, 2021, 08:32 AM IST
सगळ्यांची क्रश असलेल्या दीपिकासोबत युवीचं का झालं ब्रेकअप?

मुंबई : क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातील नात कायम चर्चेत असतं. भारतीय क्रिकेट संघाचच्या खेळाडूंचे बॉलिवूड अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध होते आणि आहेत. त्यापैकी अनेक जोडप्यांनी लग्न देखील केलं. पण काहीचं नात फार काळ काही टिकलं नाही. त्यामधील एक कपल म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युवराज सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण. दोघांच्या नात्याच्या चर्चांना तुफान उधाण आलं. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. 

मीडिया रिपोर्टनुसार युवराज सिंग आणि दीपिकाची भेट 2007साली टी20 वर्ल्ड कपनंतर झाली. पहिल्याचं भेटीत दोघे चांगले मित्र झाले. भेटी वाढत गेल्या आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघे अनेकदा डेटसाठी देखील जायचे. मिळालेल्या माहितीनुसार दीपिकाने युवराजसाठी एर पार्टी देखील होस्ट केली होती. पण काही दिवसांनंतर त्यांच्य ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. 

त्यानंतर युवराजने एका मुलाखतीत ब्रेकअपचं खरं कारण सांगितलं. युवराज म्हणाला, 'मी दक्षिण आफ्रिकेतून परत आलो होतो. आमची ओळख कॉमन मित्रांच्या माध्यमातून झाली होती. आम्ही एकमेकांना पसंद करत होतो. एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. पण समोरच्याला ओळखण्यासाठी आम्ही पुरेसा वेळ देवू शकलो नाही. गोष्टी बदलल्या आणि दीपिका तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली.' असं युवी म्हणाला.

दरम्यान, दीपिका पादकोण -  रणवीर सिंहचा विवाह सोहळा इटलीतील लेक कोमो इथं पार पडला. १४ नोव्हेंबरला दीपिकाच्या कोकणी पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.