मुंबई : एकेकाळी संपूर्ण बॉलिवूड विश्वात चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे झीनत अमान. झीनत अमान हे त्याकाळच्या सगळ्याच सुंदर आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्याकाळी बहुतेक अभिनेत्री साड्यांमध्ये दिसायच्या त्या काळात झीनत अमान हॉट आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घालायच्या. त्यांचे अनेक चित्रपट गाजले. अलीकडेच झीनत कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये पोहोचल्या जिथे त्यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधीत अने खुलासे केले.
झीनत अमानला शोमध्ये कपिल शर्माने गमतीशीरपणे प्रश्न विचारला, तुम्ही आम्हाला तुमच्या सिनेमात अनेकदा धबधब्यात किंवा पावसात आंघोळ करताना दिसला आहात. तर तुम्ही डायरेक्टरला कधी असा प्रश्न नाही का विचारलात की, मला सारखी अंघोळ करायला का लावता?
याला उत्तर देताना झीनत अमान म्हणाल्या, "कोणीतरी माझ्या मनात ही गोष्ट भरली होती की, जेव्हा जेव्हा दिग्दर्शक मला पावसात आंघोळ करायला लावतो, तेव्हा निर्मात्याकडे पैशांचा वर्षाव होतो."
अब्दुल्ला चित्रपटाच्या सेटवर झीनत अमानची संजय खानसोबत ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढू लागली. ते जिथे जातात तिथे ते एकत्र जायचे. त्यानंतर या जोडप्यामधील प्रेम वाढत गेले.
एका मासिकानुसार दोघांनीही गुपचूप लग्न केले होते. परंतु नंतर एकमेकांना वेळ देऊ न शकल्याने हळुहळु दोघांमधला दुरावा वाढू लागला. संजय खान तसे संतप्त स्वभावाचे व्यक्ती आहेत. एके दिवशी त्यांनी झीनतला भेटायला बोलावले. पण अभिनेत्रीकडे वेळ कमी होता, त्यामुळे त्यांनी भेटण्यास नकार दिला.
त्यानंतर काही काळीने झीनत यांना त्यांच्या कामातून मोकळीक मिळताच त्या संजयच्या घरी पोहोचल्या. संजय कसे रिअॅक्ट करतील हे त्यांनी माहीत नव्हते, ज्यामुळे त्या खूप घाबरल्या होत्या.
त्या संजय खान यांच्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांना समजले की संजय एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी करत आहे. यावेळी अनेक लोक तेथे उपस्थित होते. हॉटेलचा संपूर्ण स्टाफही तिथे होता. झीनतला पाहून संजयला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. त्यांनी झीनतला इतका मारहाण केली की तिचा जबडा तुटला आणि उजव्या डोळ्याची दृष्टी कमकुवत झाली.
संजय खान यांनी त्यांच्या द बिग मिस्टेक्स ऑफ माय लाइफ या चरित्रात देखील या घटनेबद्दल लिहिले आहे.
त्याघटनेनंतर झीनत यांनी सर्व काही विसरुन 1985 मध्ये मजहर खानसोबत लग्न केले. लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. मजहर देखील अनेकदा झीनत अमानला मारहाण करायचे. त्यानंतर किडनी निकामी झाल्यामुळे मजहरचा मृत्यू झाला.