शाहरूख खानच्या 'झिरो' सिनेमाचा फर्स्ट लूक

किंग खान वाढदिवसादिवशी देणार स्पेशल सरप्राईज 

शाहरूख खानच्या 'झिरो' सिनेमाचा फर्स्ट लूक

मुंबई : जगभरात शाहरूख खानचे चाहते असंख्य आहेत. शाहरूख खानच्या वाढदिवसाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात. 2 नोव्हेंबर रोजी शाहरूख खान आपला वाढदिवस साजरा करणार आहे. उद्या त्याच्या चाहत्यांसाठी खास सेलिब्रेशन असणार आहे. शाहरूखच्या 'झिरो' या सिनेमाचा ट्रेलर उद्या लाँच होणार आहे. 

आज या सिनेमाचे दोन पोस्टर्स रिलिज झाले आहेत. या पोस्टर्समधून असं स्पष्ट होतंय की शाहरूख खान अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफसोबत रोमान्स करताना दिसत आहे. पहिल्या पोस्टरमध्ये तो अनुष्कासोबत ऑटोमॅटिक व्हीलचेलरमध्ये बसलेला दिसतो. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये कतरिना कैफसोबत एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. 

21 डिसेंबर रिलीज होणार हा शाहरूखचा बिग बजेट सिनेमा आहे. 'झिरो' सिनेमात अनेकदा वीएफएक्सचा वापर केल्याचं दिसून येतंय या सिनेमाकरता 200 करोड रुपये खर्च केला आहे. या सिनेमाचं शुटिंग 150 हून अधिक दिवस चाललं आहे.